बापरे! कोबरा नाग हातात घेणं जीवावर बेतलं! शेपटी पकडताच झटकन दंश! 'या' जिल्ह्यातील तरुणाचा मृत्यू
प्राण्यांसोबत जीवाचा खेळ खेळू नये हे वारंवार सांगितले जाते पण कोण कधी कसा खेळ करेल आणि त्याच्याच आयुष्याचा खेळ होईल हे कधी सांगता येत नाही... एका तरुणाने कोबरा नागालाच चक्क हातात घेतलं पण या नागाने शेवटी रंग दाखवलाच अन् कचकटून हाताला चावा घेतला मग.. पुढे जे घडलं ते ऐकून धक्का बसावा अशी ही घटना आहे.
नागाने दंश केल्याने या तरुणाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून सापासोबतची मस्ती पार जीवावरच बेतली अन् नाहक जीव गमावला. ही घटना १० जुलै रोजी घडली.

प्राप्त माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील ही घटना आहे. पाटील टोला येथील लक्की बागडे या युवकाचा साप चावल्याने मृत्यू झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाटील टोला येथे कोबरा साप आढळल्याची माहिती लक्की बागडेला मिळाली. त्यानंतर साप पकडण्यासाठी लक्कीने पाटील टोला येथे धाव घेतली. विशेष म्हणजे तो काही सर्पमित्रही नव्हता असे म्हटले जात आहे.
काय घडला पुर्ण प्रकार?
लक्की बागडे ज्यावेळी पाटील टोला येथे गेला तेव्हा त्याने तिथे साप पाहिला आणि त्याला साप पकडण्याचं कोणतही प्रशिक्षण नव्हतं, ना त्याने कोणतीही सुरक्षा घेतली, केवळ इच्छा म्हणून त्याने साप पकडण्याचा प्रयत्न केला. त्याने शेपटीला हात लावून सापाला उचलले पण या सापाने त्याच्या हाताला चावा घेतला.
रुग्णालयात धाव अन् ...
दरम्यान सापाने दंश केल्यानंतर तातडीने त्याला तुमसर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्राथमिक उपचार सुरू असतानाच त्याची प्रकृती अधिक बिघडली. त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.












Click it and Unblock the Notifications