Gondia Hit and Run: गोंदियात 'हिट अँड रन!' सुसाट कारनं तिघांना चिरडलं! 2 गंभीर, थरार सीसीटीव्हीत कैद
पुणे मुुंबईनंतर गोंदियात आज 'हिट अँड रन!ची भीषण घटना आज घडली आहे. या दुर्घटनेत एका सुसाट कारनं तिघांना चिरडलं असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा थरार सीसीटीव्हीत कॅमेरात कैद झाला आहे.
मुंबई पुण्यानंतर आता हिट अँड रनची घटना गोंदीयात घडल्यानं खळबळ उडाली आहे. या घटनेत दोन ट्रकचालक रस्त्याच्याकडेला बसले होते तर एक सायकलस्वारही तिथं होता. या तिघांना सुसाट कारनं चिरडलं. यात तिघांपाकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

खाजगी रुग्णालयात उपचार सुरू
गोंदियात आज सकाळी पॉलिटेक्निक कॉलेज समोर हिट अँड रनचा थरात पाहायला मिळाला असून हि संपूर्ण घटना रस्त्यावर लागलेल्या एका सी सी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या अपघात तीन लोक गंभीर जखमी झाले असून तिघांवर गोंदियातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत असं सुत्रांनी सांगितलयं.
अशी आहेत जखमींची नावे
गोरेगाव वरून गोंदियाच्या दिशेने येत असताना पॉलिटेक्निक कॉलेज समोर भरधाव कारणे रोडचा कडेला बसलेल्या दोन ट्रक ड्रायव्हर व एक सायकल चालकाला भरधाव वेगाने येत उडवले. या घटनेत दोन ट्रक ड्रायव्हर आणि एक सायकलस्वार गंभीर जखमी झाला. यात 24 वर्षीय कार चालक खोमेश उरकुडे (रा. कोसेटोला गोरेगाव) तर जखमीमध्ये 54 वर्षीय हेमराज राऊत (रा. कारंजा) तसंच 38 वर्षीय कादीर शेख (रा. फुलचुर) येथील आहेत. एक सायकलस्वार या घटनेत गंभीर जखमी असून तिघांवर गोंदियातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
गोंदियात 'हिट अँड रन' थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद..जीव इतका स्वस्त झालायं का? वेगाला चाप कोण लावणार..? pic.twitter.com/J1uCJihw6A
— manoj sakhre (@SManojDBDIGITAL) September 2, 2024
घटना साीसीटीव्हीत
दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पोलिस घटनेची माहिती घेत आहेत. तसंच नेमका अपघाकत कसा घडला याचीही चौकशी केली जात आहे. घटनास्थळाहून सीसीटीव्ही फुटेजही मिळालं असून यात चुक कुणाची होती हेही तपासलं जात आहे. या घटनेमुळं रस्त्यावर जीव मुठीत जाण्याची वेळ सामान्यांवर येत असून रस्त्याच्या कडेला बसणंही मुश्किल झालं आहे.(Gondia Hit and Run)












Click it and Unblock the Notifications