Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

नववर्षाच्या शुभेच्छा द्यायच्यात; तर अगोदर या हटके शुभेच्छा जरा वाचाच...

नव्या वर्षाच्या स्वागताला सगळेच अतुर झाले आहेत. यावेळी थर्टी फस्टला आंबटशौकिनांसाठीही पहाटे पाचपर्यंत दारु दुकाने उघडी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या वर्षाच्या आगमनाला आता फक्त दोन दिवस शिल्लक आहेत. प्रियजन, मित्र-मैत्रिणी, आप्तेष्ट, वरिष्ठ, सहकारी या सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा देणेही सुरु झाले आहे. आपल्या आयुष्यातील खास लोकांना काही खास संदेश या निमित्ताने पाठविले जातात. असेच काही हटके संदेश आपण आज पाहणार आहोत...

Happy Quotes

सर्वांसाठी शुभेच्छा

जुने वाईट विसरा आणि नवीन वर्षासाठी नव्या धुंदीत प्रवेश करा, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
नवीन वर्ष आलंय प्रकाशाच्या रूपात, या वर्षात तुमचं भाग्य उजळो. नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
नवीन वर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सुख, संपत्ती, यश, आरोग्य, सन्मान, शांती आणि समृद्धी देवो या शुभेच्छा.
दुःखाच्या सावलीपासून नेहमी दूर राहा... तुमच्या प्रत्येक इच्छा आणि प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो, या अंत:करणापासून नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
या नवीन वर्षात जे तुम्हाला हवे आहे ते मिळो, प्रत्येक दिवस सुंदर आणि रात्र उज्ज्वल असो, यश तुमच्या पायाशी लोळो. नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
नोव्हेंबर गेला, डिसेंबर संपला, सर्व उत्सव समाप्त झाले. जगाने नवीन वर्ष साजरे केले, ज्यासाठी तुम्ही उत्सुक होते. तुमचं 2025 वर्ष शुभ आणि यशस्वी असो.
नवीन वर्षात आपलं मित्रत्व अधिक गाढ होवो, वर्ष येते आणि जातं, पण मित्रत्व सदैव फुलत राहते. 2025 चं वर्ष शुभ होवो.
प्रत्येक वर्ष काहीतरी देऊन जातं, प्रत्येक नवीन वर्ष काहीतरी घेऊन येतं, चला तर, या वर्षाला काही चांगले काम करून नवीन वर्ष साजरा करूया!
जुने वर्ष सर्वांपासून दूर जात आहे, काय कराल, हेच निसर्गाचं नियम आहे, पूर्वीच्या आठवणींत चिंतेत राहू नका, नवीन वर्ष आनंदाने स्वीकारा!

शुभेच्छा मित्रांसाठी

सर्वांच्या हृदयात असू दे प्रेमाची भावना
गरिबांना मिळू दे अन्न, वस्त्र आणि निवारा
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नवी स्वप्नं, नव्या आशा, नवी उमेद
व नाविन्याची कास धरत
नवीन वर्षाचं स्वागत करू.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

खूप सुंदर असा प्रवास होता 2024 या वर्षाचा
2025 मध्येही अशीच सोबत कायम राहू दे
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रियजनांसाठी शुभेच्छा

"दुःखाच्या सावल्या दूर सारू,
नव्या आशांचा सूर्य उजाडू,
नव्या वर्षात सुखाच्या वाटेवर चालू...
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!"

"भूतकाळातील काटे विसरू,
प्रत्येक क्षण आनंदाने भरू,
आयुष्यात नवी दिशा शोधू...
नववर्षाच्या शुभेच्छा!"

"दुःखाचे सारे पडदे दूर करून,
स्वप्नांच्या प्रकाशात नवा मार्ग शोधू,
नव्या वर्षात नवा उत्साह घेऊन जगू...
नववर्षाच्या शुभेच्छा!"

"नवीन आशेची किरणे घेऊन येणारे हे नवे वर्ष,
तुमच्या जीवनात भरभराट आणि आनंद घेऊन येवो...
नववर्षाच्या शुभेच्छा!"

"जुन्या दु:खांना विसरून, नव्या स्वप्नांना कवटाळू,
प्रत्येक क्षण सुखात आणि यशात सजवू...
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!"

"स्वप्नांच्या गगनात भरारी घेऊ,
यशाच्या वाटेवर उभे राहू,
सुखाचा दीप नव्या वर्षात पेटवू...
नववर्षाच्या शुभेच्छा!"

"दुःखाच्या रात्री संपवू,
आनंदाच्या नव्या सकाळी जागू,
प्रत्येक दिवस सुखाचा अनुभवू...
नवीन वर्षाच्या शुभेच्छा!"

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+