मीही स्वतःला अटक करून घेतो! गिरीश महाजन यांचे मोठे विधान, कुणाला दिला इशारा...
भाजप नेते गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. जामनेर येथील तरुणाच्या हत्या प्रकरणात खरे आरोपी सापडले पाहिजेत, या खडसे यांच्या मागणीवर गिरीश महाजन यांनी जोरदार टोला लगावला आहे. महाजन म्हणाले, "खडसेंच्या मनात काय आहे, हे मला माहीत नाही. त्यांना कोणावर संशय असेल तर त्यांनी सांगावं, त्यांना अटक केली जाईल. माझं नाव घेत असतील, तर मीही स्वतःहून पोलिसांना शरण जाऊन अटक करून घेईन." त्यांच्या या विधानामुळे जळगावच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. जामनेर 'मॉब लिंचिंग' प्रकरणात आतापर्यंत नऊ आरोपींना अटक करण्यात आल्याचेही महाजन यांनी सांगितले.

इम्तियाज जलील यांच्यावरही टीका
स्वातंत्र्यदिनी मांस विक्रीवर बंदी असताना, एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी मांसाहार शिजवून सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. गिरीश महाजन यांनी या कृतीचा निषेध केला. "सरकारने बंदी घातली असताना असे करणे चुकीचे आहे," असे महाजन म्हणाले.
रक्षा खडसे यांनाही प्रत्युत्तर
एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या अटकेनंतर खडसे कुटुंबावर होत असलेल्या आरोपांवर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी प्रतिक्रिया दिली होती. "जिल्ह्याच्या विकासावर लक्ष केंद्रित करा, असे आरोप-प्रत्यारोप थांबवा," असे आवाहन त्यांनी केले होते. यावर गिरीश महाजन यांनी रक्षा खडसे यांनाच प्रत्युत्तर दिले. "त्यांनी आधी आपल्या घरी हा सल्ला द्यावा," असे म्हणत त्यांनी राजकीय वादात आणखी भर घातली. महाजन यांच्या या विधानांवर खडसे काय प्रतिक्रिया देतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.












Click it and Unblock the Notifications