गौरी विसर्जन करताना आवर्जून घ्या 'या' गोष्टींची काळजी, करु नका 'या' चूका

Gauri Visarjan 2024 : देशभरात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. विघ्नहर्त्या गणरायाचे आणि गौरी आवाहन झाल्यानंतर आज गौरी विसर्जनाचा दिवस आहे. त्यामुळे आपल्या गौरींचे विसर्जन अगदी पारंपरिक पद्धतीने आणि थाटामाटात निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी प्रत्येकाच्याच घरी लगबग सुरु आहे. मात्र, गौरी विसर्जनाच्या वेळी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच काही चुका टाळणे आवश्यक आहे. यामुळे गौरी विसर्जन निर्विघ्न पार पडू शकते.

गौरी विसर्जनाचा मुहूर्त

यंदा 12 सप्टेंबर रोजी म्हणजेच आज दुपारी 1 वाजून 31 मिनिटांनी ते रात्री 9 वाजून 51 मिनिटांपर्यंत आहे. या कालावधीत तुम्ही गौरी विसर्जन करता येईल.

Gauri Visarjan

ज्येष्ठा गौरी विसर्जन पूजा विधी

-गौरी विसर्जनादिवशी शुभ मुहूर्तावर गौरींची विधीवत पूजा करून आरती केली जाते आणि त्यानंतर मुर्तीचे मुकूट हलवून गौरींना निरोप दिला जातो

-त्याआधी घरासमोर रांगोळी काढून हळदी-कुंकवाने गौरींची मार्गस्त पावले काढली जातात. त्यासाठी हातांच्या छापे काढले जातात आणि गौरीचे विसर्जन केले जाते.
- काही ठिकाणी गौरींच्या मुर्ती विसर्जित केल्या जातात तर काही ठिकाणी त्याच मूर्ती परंपरागत वापरण्याची प्रथा आहे. राज्यातील विविध भागात हा उत्सव वेगवेगळ्या प्रथा, परंपरा आणि मान्यतांनुसार साजरा केला जातो.

गौरी पूजनाचे काय आहे महत्व

पौराणिक कथेनुसार राक्षसांच्या अत्याचाराला कंटाळून आणि त्यांच्या सौभाग्याचे रक्षण करण्यासाठी महिलांनी देवी पार्वतीला आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत माता पार्वतीने भाद्रपद शुक्ल अष्टमीला राक्षसांचा वध करून पृथ्वीवरील प्राणिमात्रांचे दुःख नाहीसे केले. त्यामुळे सर्व स्त्रिया अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी भाद्रपद शुक्ल अष्टमीला ज्येष्ठ गौरीचे व्रत करतात. गौरी हे माता पार्वतीचे दूसरे नाव आहे. ज्येष्ठा गौरी पूजन हा महाराष्ट्रातील लोकप्रिय सणांपैकी एक महत्वाचा सण आहे.

गौरी विसर्जन करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी

-गौरी विसर्जना दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करा गौरीचे आभार मानण्यासाठी आणि गौरीला निरोप देण्यासाठी गौरीची पूजा केली जाते.

-उत्तर पूजेच्या वेळी गौरीला हळद, कुंकू, नारळ, सुपारी, अगरबत्ती आणि फराळाचे पदार्थ अर्पण करा.
गौरी विसर्जनाच्या वेळी 5 सौभाग्यवती महिलांना बोलावून थाळीचे वाण द्यावे आधी ताट देवीसमोर दाखवावे नंतर त्याची पूजा करावी.

-गौरीची आरती झाल्यानंतर देवीवर अक्षता वाहून तिला दही भाताचा नैवेद्य दाखवावा. सोबतच विडा द्यावा.

-गौरी मुखवट्याच्या म्हणजेच पंचधातूंच्या, सोन्या-चांदीच्या असतील तर दागिने घातले असतील तर ते काढून देवीचे विसर्जन करावे.

- देवीच्या विसर्जनानंतर त्यातली थोडी माती आणून घरातील चौरंगावर ठेवावी.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+