Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

साताऱ्याच्या गौरीला पुण्याच्या राकेशने का संपवलं? 2 वर्ष संसार, पती-पत्नीच्या नात्याचा बंगळुरात खून!

Gauri Khedekar Murder Case : गौरी राकेश खेडेकर - सांबरेकर (माहेरचे आडनाव) हिचा निर्घून खून केला. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते सुटकेसमध्ये ठेवून तो पसार झाला होता. या हत्येने खळबळ उडाली असून तूर्त संशयित पती राकेशला पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे.

दोन वर्षांपुर्वी सातारा येथील गौरी सांबरेकर हिच्याशी पुण्यातील राकेश खेडेकर याचे लग्न झाले. मास कम्युनिकेशनमध्ये शिक्षण घेतलेली गौरी ही सुद्धा नोकरीच्या प्रयत्नात होती. तिचा पती राकेश खेडेकर बंगळुरूत उच्च पदावर नोकरीला होता. नोकरीसाठी तो पत्नी गौरीला घेऊन जवळपास एक महिन्यापूर्वी बंगळुरूत शिफ्ट झाला होता. हुलीमावू पोलिस स्टेशनच्या हद्दीतील दोड्डाकम्मनहल्ली येथे तिसऱ्या मजल्यावर भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहत होते.

Gauri Khedekar Murder Case

दोघांत व्हायचे भांडणं

शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितलेल्या माहितीनुसार, राकेश आणि गौरी यांच्यात नेहमी वाद होत असे. क्षुल्लक कारणावरुन होणाऱ्या वादामुळे राकेश आणि गौरी दोघांनाही मानसिक तणावात होते, अशी माहिती प्रथमदर्शनी समोर आली आहे.

असा केला खून ..

राकेशने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात मंगळवारी रात्री जेवताना या दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरुन भांडण झाले. त्यावेळी राकेशला संताप आला आणि त्याचा संयम सुटला. त्याने किचनमधील चाकू घेऊन गौरीला दोन-तीन वेळा भोसकले. यानंतर गौरी रक्ताच्या थारोळ्यात पडली अन् तिचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा : धक्कादायक! महाराष्ट्रीयन तरुणीची बंगळुरूत हत्या; सुटकेसमध्ये आढळले मृतदेहाचे तुकडे पती पुण्याला पसार

गौरीच्या हत्येची दिली कबुली

प्राप्त माहितीनुसार, गौरीची हत्या केल्यानंतर सुटकेसमध्ये तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन टाकले. ती सुटकेत बाथरुममध्ये पोलिसांना सापडली. तत्पुर्वी राकेशने बंगळुरूतून पुण्यात पळ काढला. पोलिसांनी पुण्यातून राकेशला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याची चौकशी केली असता चाकू भोसकून गौरीचा खून केल्याची त्याने कबुली दिली.

राकेशनेही पिले होते झुरळ मारण्याचे औषध

राकेशने पत्नी गौरीचा खून केला. दरम्यान त्याने स्वःत झुरळ मारण्याचे औषध पिले होते हे राकेशनेच पोलिसांना सांगितले आहे, मात्र त्याने हे औषध कधी पिले होते हे स्पष्ट नाही. सध्या राकेशवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+