Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

नवी मुंबई : दुकानात ठेवलेल्या 3 गॅस सिलिंडरचा स्फोट, महिला आणि दोन मुलांचा मृत्यू

नवी मुंबई : नवी मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. उलवे पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या जावळे गावात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन तिघांचा मृत्यू झाला आहे. एका दुकानात ठेवलेल्या गॅस सिलिडरचा स्फोट झाल्याने दुकानाला आणि घराला आग लागली. या आगीत दुकानाचे मालक जखमी झाले असून त्यांची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. ही घटना काल ता. 30 ऑक्टोबरला संध्याकाळी 8 च्या सुमारास घडली आहे.

Gas cylinder explosion general store

किराणा दुकानात ठेवलेल्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने दुकानाला आणि घराला आग लागली. या घटनेत दुकानदार रमेश घांसी जखमी झाले असून त्यांची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाला. जखमी रमेश यांच्या नवी मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती पोलिस प्रशासन आणि अग्निशामन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आता परिस्थिती नियंत्रणात आहे.

जखमींना स्थानिक नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्या सध्या उपचार सुरु आहेत. अग्निशमन दलाच्या २ बंबांच्या मदतीने आग विझवली असल्याची माहीती अग्निशमन अधिकारी विजय राणे यांनी सांगितले. गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे आग लागल्याचे प्रथमदर्शनी दिसते, मात्र यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या घर आणि दुकानाला आग कशी लागली याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+