Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'गरबा किंग' गरबा खेळताना अचानक कोसळले अन् जागीच जीव गेला, पाहा- थरारक VIDEO

अचानक चक्कर येऊन पडणे अन् जागीच मृत्यू होण्याच्या घटना काही केल्या थांबता थांबेना. नियमीत व्यायाम करणाऱ्या लोकांना देखील अचानक हॉर्ट अटॅक येतो अन् त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना आपण सातत्याने समाजात घडताना पाहत असतो. अशीच थरारक व हृदय पिळवटून टाकणारी घटना पुणे शहरात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गरबा किंग म्हणून ओळखले जाणारे अशोक माळी यांचा गरबा खेळताना काही क्षणातच मृत्यू झाला आहे.पुण्यातील चाकणमध्ये लेकासोबत गरबा खेळताना अचानक भोवळ आली आणि ते खाली कोसळले, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Garba King Ashok Mali Death Video

दरम्यान अशोक माळी खाली कोसळताच उपस्थितांनी त्यांना तात्काळ उचलून रुग्णालयात नेले. मात्र, त्यांचा काही फायदा झाला नाही. डॉक्टरांनी माळींना तपासून मृत घोषित केले. हा सर्व प्रकार लोकांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेला आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोण होते अशोक माळी?

अशोक माळी यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील होळ गावात झाला. शालेय जीवनापासूनच त्यांनी वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते पुणे येथे स्थायिक झाले. अशोक माळी हे गेल्या चार- पाच वर्षापासून गरबा प्रशिक्षक म्हणून काम करतात. नवरात्रीमध्ये वेगवेगळ्या मंडळांकडून त्यांना आमंत्रण असते. यंदा देखील चाकणमधील एका ठिकाणी गरबा खेळण्यासाठी गेले होते.अशोक माळी यांच्यासोबत त्यांचा मुलगा भावेश देखील गेला होता.

व्हिडिओत दिसणारा थरारक प्रकार?

या व्हिडिओत अशोक माळी खूप आनंदाने एका चिमुकल्यासोबत घुंगट मे चाँद होगा आखो मे सजनी... या गाण्यावर आनंदाने आपल्या लेकासोबत गरबा खेळत होते आणि अचानक ते जमिनीवर कोसळतात. त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांकडून त्यांना मृत घोषित करण्यात आले. अशोक माळी हे पुणे आणि महाराष्ट्रातील गरबा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होते. त्यांच्या अचानक जाण्यामुळे पुण्यातील कलाविश्वात शोककळा पसरली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+