Ganeshotsav Maharashtra Rain :आज बप्पांचे आगमन पावसातच, 'या' जिल्ह्यांत विजासह मेघगर्जना अन् बरसात
Ganeshotsav Maharashtra Rain today : महाराष्ट्रात गणेशउत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून गणेशाचे आगमन होत आहे. गणपती बप्पा आज त्यांच्या आगमनासह पुढील तीन ते चार दिवस पाऊस घेऊन येत आहेत. त्यामुळे आज गणपती बप्पांचे पावसात जल्लोष करावा लागणार आहे.
पुणे हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन-तीन दिवस कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

या जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
आज दिनांक 27 व उद्या 28 ऑगस्ट रोजी सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात तसेच 28 ऑगस्टला कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट विभागात काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे, त्यामुळे संबंधित घटक क्षेत्रामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
Moderate rainfall very likely to occur at most places in the districts of Konkan and Goa.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 26, 2025
मुंबईसह, रायगड रत्नागिरीला येलो अलर्ट
आज 27 ऑगस्ट रोजी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात आणि नाशिक, पुणे व कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी अति जोरदार पावसाची शक्यता असल्याने या सर्व ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे.
धुळे, नंदुरबार, जळगावात आज कसा असेल पाऊस
पुढील दोन-तीन दिवस धुळे, नंदुरबार, जळगाव, विदर्भातील उर्वरित जिल्हे आणि त्या लगतच्या मराठवाड्यातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाटासह ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाच्या वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित सर्व ठिकाणी सुद्धा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे आणि आसपासचा परिसर
पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी पुढील चार-पाच दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर घाट विभागात पुढील चार-पाच दिवस तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे पुणे हवामान विभागाने घाट विभागासाठी येलो अलर्ट दिला आहे.
-
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!








Click it and Unblock the Notifications