गणेशोत्सवासाठी शाळांना किती दिवसांची सुट्टी? पालक आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून, या उत्सवासाठी शाळांना किती दिवस सुट्टी मिळणार याबद्दल पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. यंदा गणेशोत्सव २७ ऑगस्टपासून सुरू होत असून, ६ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन होणार आहे. या ११ दिवसांच्या उत्सवादरम्यान शाळांना मिळणाऱ्या सुट्ट्यांबाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:

ganeshotsav-2025-school-holidays-maharashtra

मुंबई आणि कोकणातील शाळांना किती सुट्ट्या?

मुंबई आणि कोकणामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. येथे राहणारे कोकणवासीय आपल्या गावी जातात. त्यामुळे या भागातील शाळांना नेहमी ५ दिवसांची सुट्टी असते. पण यंदा गौरी-गणपती विसर्जन ७ दिवसांनी होत असल्यामुळे मुंबई आणि कोकणातील सरकारी शाळांना ७ दिवसांची सुट्टी मिळणार आहे. गौरींचे आगमन ३१ ऑगस्ट रोजी, पूजा १ सप्टेंबरला आणि गौरी-गणपती विसर्जन २ सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे ज्या घरांमध्ये गौरी येतात, तेथे बाप्पाचे विसर्जन ७ दिवसांनी केले जाते, म्हणून सुट्ट्यांमध्ये वाढ झाली आहे. सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळांना मात्र ५ दिवसांची सुट्टी मिळू शकते.

इतर ठिकाणी किती दिवसांची सुट्टी?

मुंबई आणि कोकण वगळता विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील शाळांना खालीलप्रमाणे सुट्ट्या मिळतील.

  • २७ ऑगस्ट: गणेश चतुर्थी
  • १ सप्टेंबर: गौराई पूजन
  • ५ सप्टेंबर: ईद-ए-मिलाद
  • ६ सप्टेंबर: गणेश विसर्जन

ज्या शाळांना शनिवार आणि रविवारची सुट्टी आहे, त्यांना या ४ दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये २ शनिवार आणि २ रविवार जोडून एकूण ८ दिवसांची सुट्टी मिळू शकते.

एकूण ९ दिवसांची सुट्टी

काही शाळांमध्ये ११ दिवसांच्या उत्सवासाठी विद्यार्थ्यांना तब्बल ९ दिवसांची सुट्टी मिळू शकते. २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबरपर्यंत सलग ७ दिवस सुट्टी असेल. त्यानंतर, ५ सप्टेंबरला ईद-ए-मिलाद, ६ सप्टेंबरला गणेश विसर्जन आणि ७ सप्टेंबरला रविवार असल्यामुळे एकूण ९ दिवसांची सुट्टी मिळेल. ज्या शाळांना ५ दिवसांची सुट्टी असेल, त्यांना ईद-ए-मिलाद, गणेश विसर्जन आणि रविवार मिळून एकूण ८ दिवसांची सुट्टी मिळू शकते.

कॉलेजेसना सुद्धा स्थानिक पातळीवर साधारणपणे ७ ते ८ दिवसांची सुट्टी मिळण्याची शक्यता आहे. या वर्षी गणेशोत्सवादरम्यान विद्यार्थ्यांना भरपूर सुट्ट्या मिळाल्याने त्यांच्या उत्साहात भर पडली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+