Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Ganesh Chaturthi CAIT Report: गणेशोत्सवामुळे बाजारात उत्साह! 25000 कोटींचा व्यवसाय होणार

Ganesh Chaturthi CAIT Report : आजपासून गणेश चतुर्थी उत्सवाला सुरुवात झाली आहे. गणेशोत्सव भारतासह अनेक देशांत मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा सण उत्साहात साजरा होत आहे. गणेश चतुर्थीनिमित्त बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण आहे, हे पाहता बाजारपेठांतही खरेदी वाढली आहे. चायनीज उत्पादनांवर बहिष्कार टाकल्यामुळे बाजारात भारतीय वस्तूंची मागणी वाढत आहे. खरेदीदारांमध्येही त्यांना मोठी मागणी आहे. कॅटच्या अंदाजानुसार, यावर्षी गणेश चतुर्थीला संपूर्ण भारतभरात सुमारे 25000 कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे.

20 लाखांहून अधिक गणेश मंडळे

अहवालानुसार, गणेश चतुर्थीमुळे महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि गोवा यासारख्या भागात आर्थिक उलाढाल वाढते. कॅटचे ​​राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, या राज्यांमधील स्थानिक व्यावसायिकांनी केलेल्या सर्वेक्षणानंतर 20 लाखांहून अधिक गणेश मंडळे उभारण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. प्रत्येक मंडळाच्या मंडपावर किमान 50,000 रुपये खर्चाचा विचार केला, तर हा आकडा 10,000 कोटींहून अधिक होतो.

Ganesh Chaturthi CAIT Report

कशावरचा खर्च वाढणार

गणेशमूर्तींचा व्यवसाय 500 कोटींपेक्षा जास्त आहे. फुले, हार, फळे, नारळ, अगरबत्ती आणि इतर पूजेच्या साहित्याची विक्रीही 500 कोटींच्या जवळपास आहे. मिठाईची दुकाने आणि घरगुती व्यवसायांची विक्री 2000 कोटींहून अधिक वाढलेली दिसते. याशिवाय, कुटुंबांद्वारे मोठ्या समारंभ आणि मेजवानी आयोजित केल्यामुळे, कॅटरिंग आणि स्नॅक्सचा सुमारे 3000 कोटी रुपयांचा व्यवसाय आहे.

याची विक्री वाढण्याची अपेक्षा

गणेश चतुर्थीच्या काळात पर्यटन आणि वाहतूक व्यवसायालाही मोठी चालना मिळते. ट्रॅव्हल एजन्सी, हॉटेल आणि वाहतूक सेवा (जसे की बस, टॅक्सी, ट्रेन) मागणीत वाढ होत आहे, ज्यांची उलाढाल 2000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते. किरकोळ व्यापाराबद्दल बोलायचे तर, सणाशी संबंधित कपडे, दागिने, गृह सजावट आणि भेटवस्तूंची विक्री देखील 3000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते. याशिवाय कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण सेवांनाही मोठी चालना मिळते. इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांनाही सुमारे 5000 कोटी रुपयांचा व्यवसाय मिळेल.असे कॅटच्या अहवालात म्हटले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+