Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Ganesh Chaturthi 2024 : गणेशाच्या आराधनेने दूर होतील सारी संकटे, फक्त करा 'हे' उपाय

विघ्नहर्ता विनायक म्हणजेच गणपती बाप्पा विघ्नांचा नाश करणारा आहे. म्हणूनच त्याला विघ्नेश्वर म्हणतात. तो सर्व समस्या सोडवतो. जो भक्त श्री गणेशाची आराधना करतो तो कधीही दुःखी किंवा निराश होत नाही, त्याला जीवनातील सर्व सुख प्राप्त होते.

गणपतीची उपासना दररोज केली जात असली आणि ती नेहमीच फलदायी असली तरी गणेशोत्सवातील दहा दिवसांचे विशेष महत्त्व आहे. या दहा दिवसांत विशेष उपाय केल्याने गणपतीला प्रसन्न करता येते.

धनप्राप्तीसाठी (For Money)

गणेशाला सर्वसिद्दी दाता म्हटलेले आहे. जर तुम्ही आर्थिक संकटाशी सामना करत असाल. जर तुम्ही कर्जात बुडत असाल तर गणपतीच्या मूर्तीसमोर बसून गणेशोत्सवादरम्यान दहा दिवस दररोज पाच वेळा गणेश ऋण मुक्ती मंत्राचा जप करा.

असा आहे मंत्र- ऊं गणेश ऋणं छिन्दीं वरेण्यम् हूं नम: फट

लाल आसनावर बसून स्फटिक जपमाळ लावून या मंत्राचा जप करा. गणपतीला मोदक अर्पण करा.

Ganesh Chaturthi 2024

संकटाचा संकट समाप्तीसाठी (For end the crisis)

जर तुम्हाला संकटाने घेरले असेल तर, कुटुंबात वाद सुरू असतील, बाहेरचे शत्रू तुम्हाला त्रास देत असतील. कोणतेही काम नीट होत नसेल, यश मिळत नसेल तर दहा दिवस नियमितपणे गणपती संकटनाशन स्तोत्राचा पाठ करा. शेवटच्या दिवशी या स्तोत्राने गणपती हवन करावे. त्वरीत फायदे होतील आणि हा प्रयोग केल्याने तुम्हाला जी समस्या सोडवायची आहे ती नक्कीच पूर्ण होईल.

विवाह लवकर जुळण्यासाठी ( For Marriage)

ज्या तरुण-तरुणींच्या लग्नात अडथळे येत आहेत. कुंडलीतील काही दोषामुळे कोणाचे लग्न जमत नसेल तर गणेशोत्सवाच्या दहा दिवसांपर्यंत दररोज 108 दुर्वा गणपतीला अर्पण कराव्यात आणि लवकर लग्नाची इच्छा मनात ठेवून ओम गं गणपतये नमः या मंत्राचा जप करावा.

कर्जमुक्तीसाठी (for debt relief)

कर्जमुक्तीसाठी ऋणहर्ता गणेश स्तोत्राचे नियमित पठण करणे लाभदायक ठरते. गणपती प्रतिष्ठापनेच्या दिवसापासून सलग 41 दिवस या स्तोत्राचे पठन करा आणि 41व्या दिवशी हवन करून पूर्णाहुती करा. दुस-या दिवसापासून 41 दिवस संकल्प करुन आणि तोच प्रयोग करा. हा प्रयोग पुन्हा करत रहा. कर्ज कधीच वाढणार नाही.

हरित गणपती प्रयोग (Harit Ganapati Prayog)

गणेशाची हिरव्या रंगाची मूर्तीची प्रतिष्ठापना करा स्थापन करा. त्याला हिरव्या गादी आणि उशीच्या लोडवर विराजमान करुन नियमित सेवा पूजा करा. यामुळे यश, बुद्धी, ज्ञान आणि विवेक प्राप्त होतो.

(अस्वीकरण: या लेखाचा अर्थ कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा निर्माण करण्याचा नाही. ही माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या गृहीतकांवर आणि माहितीवर आधारित आहे. OneIndia Marathi लेखाशी संबंधित कोणत्याही इनपुट किंवा माहितीची पुष्टी करत नाही, म्हणून, कोणतीही माहिती लागू करण्यापूर्वी, कृपया एखाद्या जाणकार ज्योतिषी किंवा पंडितांचे मार्गदर्शन घ्या.)

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+