Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

शंभुराज देसाईंनी घेतले दगडूशेठ गणपतीचे दर्शन,बाप्पाकडे केली ही प्रार्थना

पुणे : देशभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध असलेला पुण्याच्या श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी सातव्या दिवशीही गर्दी केली. अनेक राजकीय नेतेमंडळीं तसेच सेलिब्रिटी आणि प्रशासकीय अधिका-यांनीहीही दगडूशेठच्या गणरायाच्या दर्शनासाठी हजेरी लावली आहे. महाराष्ट्राचे गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन विभागाचे राज्य मंत्री शंभुराज देसाई यांनी सहकुटुंब दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन आरती केली.

दरम्यान माध्यमांशी बोलताना शंभुराज देसाई यांनी सांगितले की,श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला येण्याची आमची15 वर्षांची परंपरा आहे. संपूर्ण परिवार गणेशोत्सवात गणरायाला अभिषेक करतो, चरणी नतमस्तक होतो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली,महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी कष्ट करत आहोत काम करत आहोत, आमच्या सर्व कामांना गणरायाचा भरपूर आशिर्वाद मिळावा. महाराष्ट्र सुख समृद्धीतील देशातील क्रमांक एकचे राज्य व्हावे हा आशिर्वाद श्रीमंतदगडूशेठ गणरायाने आम्हाला द्यावा अशी प्रार्थना.

Shambhuraj Desai

दिग्गजांची दर्शनाला हजेरी

पिंपरी पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दगडूशेठ हलवाई गणपती चे दर्शन घेऊन आरती केली. तिस-या दिवशी अभिनेता विवेक ओबेरॉयने दर्शनाला हजेरी लावली होती. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी दगडूशेठ गणपती चे दर्शन घेऊन आरती केली. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांनीही दर्शन घेऊन आरतीही केली. तसेच सहकार आणि पणनचे मुख्य सचिव अनुपकुमार लीना श्रीवास्तव( आयटीआयआरएस) यांनी दर्शन घेतले. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनीही आरती केली. रविवारी अप्पर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले.

जटोली येथील 'श्री शिव मंदिर'चा देखावा यंदाचे आकर्षण

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव मंडळाने यंदा हिमाचल प्रदेश, जटोली येथील 'श्री शिव मंदिर'चा देखावा केला असून तो भाविकांचे आकर्षण ठरत आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव मंडळ दरवर्षी गणेशोतस्वात भारतातील विविध मंदिरे, राजप्रासाद यांच्या प्रतिकृती साकारते. देशातील सांस्कृतिक परंपरेचे जतन करून राष्ट्रीयत्वाची भावना वृध्दिंगत करण्याचा प्रयत्न ट्रस्टच्या वतीने केला जातो.

या वर्षीच्या गणेशोत्सवात संस्थेतर्फे हिमाचल प्रदेशमधील जटोली येथील 'श्री शिव मंदिर' हा देखावा उभा केला आहे. नयनरम्य विद्युत रोषणाईने तो नटविण्यात आला आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही सामूहिक अथर्वशीर्ष पठण करण्यात आले यात 35000 महिलांनी भाग घेतला याशिवाय,हरी जागर, सामूहिक अग्निहोत्र, ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक, महाअभिषेक, गणेश याग, सत्यविनायक पूजा, मंत्र जागर यासारख्या विविध धार्मिक कार्यक्रमांचे तसेच सामूहिक सूर्यनमस्कारांचे करण्यात आले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+