Ganesh Chaturthi 2024 : गणपतीची आराधना केल्याने मिळते सुख-समृद्धी, जाणून घ्या गणेश चतुर्थीचे महत्त्व
Ganesh Chaturthi 2024, Ganesh Puja & Prasad : हिंदू धर्मात गणेश चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. वैदिक दिनदर्शिकेनुसार गणेश चतुर्थी दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला साजरी केली जाते. हा उत्सव गणपती बाप्पाला म्हणजेच गणपतीला समर्पित आहे. शास्त्रानुसार या दिवशी श्रीगणेशाचा जन्म झाला होता.
गणपती वंदनाने शुभ कामांची सुरुवात केली जाते. अनेक गोष्टी बदलल्या पण गणेशाच्या उपासनेच्या पद्धती त्याच आहेत. चतुर्थीला गणपतीचा उपवास करुन आजही श्रीगणेशाचे अनेक भाविक भक्त चंद्र दिसत नाही तोपर्यंत चतुर्थी सोडत नाही अर्थात भोजनग्रहण करत नाही.

गणेश चतुर्थीदिवशी महाराष्ट्रात तसेच देशभरात लोक घरी गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करतात आणि पूर्ण विधीपूर्वक त्यांची पूजा करतात. हा उत्सव 10 दिवस चालतो आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. यंदा गणेश चतुर्थी 7 सप्टेंबर रोजी साजरी होणार आहे. आतापासूनच जोरदार तयारी सुरु असून घरोघरी गणपती आगमानाची तयारी सुरु आहे. आम्ही तुम्हाला तारीख आणि मुहूर्त आणि गणेश चतुर्थीचे महत्व काय आहे या बद्दल सांगत आहोत.
वैदिक दिनदर्शिकेनुसार, भाद्रपद महिन्याची चतुर्थी तिथी 06 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 03:02 वाजता सुरू होत आहे. ही तारीख 07 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 05:38 वाजता संपेल. अशा स्थितीत आधार मानून 07 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीचा सण साजरा केला जाणार आहे.
गणेश चतुर्थी शुभ मुहूर्त
वैदिक दिनदर्शिकेनुसार 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीची पूजा आणि मूर्तीची स्थापना करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 11:02 ते दुपारी 1:33 पर्यंत असेल. या दरम्यान तुम्ही गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करू शकता. तसेच, गणपतीची अशी मातीची मूर्ती बसवावी की त्याची सोंड उजव्या बाजूला असावी, त्यात पवित्र धागा असावा आणि त्यात मूषक असावा. मूर्तीमध्ये गणपती बसलेल्या स्थितीत असावा. तसेच गणपतीची मूर्ती घराच्या उत्तर किंवा ईशान्य कोपऱ्यात बसवावी.
गणेश चतुर्थीचे महत्व
गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची आराधना केल्याने सुख-समृद्धी मिळते. त्याचबरोबर सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते आणि कार्य सिद्धीस जाते. तसेच गणेश चतुर्थीला घरात श्रीगणेशाची प्रतिष्ठापना केल्याने देव सर्व बाधा दूर करतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, गणपतीच्या पूजेदरम्यान त्यांना 21 दुर्वा अर्पण कराव्यात. असे करणे अत्यंत शुभ मानले जाते. दुर्वा अर्पण करताना 'श्री गणेशाय नमः दुर्वांकुरण समर्पयामि' या मंत्राचा जप करा.












Click it and Unblock the Notifications