Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Lalbaugcha Raja : अंबानींकडून लालबागच्या राजाला 20 किलोचा सोन्याचा मुकूट अर्पण, जाणून घ्या किंमत

Lalbaugcha Raja : शनिवारपासून देशभरात गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. याआधी गुरुवारी सायंकाळी मुंबईतील प्रसिद्ध 'लालबागच्या राजा'चा फर्स्ट लूक समोर आला आहे. यावेळी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गणपती बाप्पा तपकिरी रंगाच्या वेषात आले आहेत. यासोबत त्यांनी सोन्याचा मुकुट परिधान केला आहे. हाच सुंदर मुकुट आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. यावेळी रिलायन्स फाऊंडेशनने लालबागच्या राजाच्या चरणी 20 किलो सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे.

देशातील गर्भश्रीमंत अंबानी कुटुंबीयांकडून हा मुकूट अर्पण करण्यात आला आहे. अनंत-राधिका यांच्या लग्नानंतरचा हा पहिलाच गणेशोत्सव असल्याने ही गणेशभक्ती अंबानी कुटुंबीयांनी दाखवल्याचं बोललं जात आहे. या मुकुटाची किंमत 16 कोटी रुपये आहे. या मुकुटात हिरे आणि इतर मौल्यवान खडेही लावण्यात आले आहेत.

Lalbaugcha Raja

मुंबईतील पितळाबाई चाळीत लालबागच्या राजाची मूर्ती बसवण्यात आली आहे. हा गणेश मंडप मुंबईतील सर्वात प्रसिद्ध मंडप आहे. लाखो भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी येथे येतात. देशात 7 सप्टेंबरपासून गणपती महोत्सवाला सुरुवात होत आहे. हा 10 दिवस सुरु राहतो. या 10 दिवसांमध्ये खूप उत्साह असतो. दहाव्या दिवशी मोठ्या थाटामाटात बाप्पाचे विसर्जन केले जाते.

लालबागच्या राजाच्या पंडालची तयारी खूप आधीपासून केली जाते. साधारण 1900 सालापासून येथे या महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. मात्र, हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पण, लालबागच्या राजाचा हा गणेशोत्सव सगळ्यात खास आहे.

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनुसार, लालबागच्या राजाची पहिली झलक अतिशय चांगल्या पद्धतीने समोर आली आहे. मंडळानकडून चांगली तयारी करण्यात आली आहे. शुक्रवारपासून राजाच्या दर्शनासाठी भाविक येणार आहेत. लालबागच्या राजाचं वैशिष्ट्य म्हणजे इथल्या गणपतीच्या मूर्तीची रचना दरवर्षी बदलते. अशा स्थितीत बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी त्याच्या भक्तांची आतुरता आहे. यावेळी बाप्पाचे अनोखी वेशभूषा आणि सुंदर सोन्याच्या मुकुटाने आगमन झाले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+