Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Ganesh chaturthi 2024 : लालबागच्या राजाच्या दर्शनला दुस-या दिवशीही भाविकांची तूफान गर्दी

Ganesh chaturthi 2024 Crowd of devotees to see the Lalbaugcha raja :लालबागच्या राजाच्या दर्शनाला भाविकांनी दुस-या दिवशीही मोठी गर्दी केली आहे. मुंबईतील वेगवेगळ्या भागातून त्याचपद्धतीने राज्यातील कानाकोपऱ्यातून भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनाला गर्दी करत आहेत. लालबागच्या राजाचा फर्स्ट लूक समोर आल्यापासून गणेभक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.

काल लाडक्या गणरायाच्या आगमन झाल्याने सर्वत्र प्रसन्न वातावरण आहे. घराघरात गणरायाचे मनोभावे स्वागत व पूजा करण्यात आली. सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये देखील गणराय विराजमान झालेत. बाप्पाच्या आगमनाने मंगलमय वातावरण निर्माण झालं आहे.

Ganesh chaturthi 2024 Crowd of devotees to see the Lalbaugcha raja

या गणेशोत्सवात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लाखो भाविक उपस्थित राहतात. देशात 7 सप्टेंबरला गणशोत्सवाला सुरुवात होत झाली. दहा दिवस गणेशोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटेपासूनच गणेशभक्त लालबागच्या राजाच्या दर्शनसाठी येत आहेत प्रत्येक वर्षी लालबागच्या राजाच्या प्रतिमेचं डिजाईन बदललं जातं, ही लालबागच्या राजाची खासियत आहे.

अंबानींकडून 16 कोटींचा सोन्याचा मुकूट

लालबागच्या राजाची मुर्तीचे गुरुवारी अनावरण करण्यात आले. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांनी रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने 20 किलोचा सोन्याचा मुकूट लालबागच्या राजाला चढवला आहे. मुकेश अंबानी आणि त्यांचे संपुर्ण कुटूंब मागील काही काळापासून लालबागच्या राजाच्या मंडळासोबत जोडले गेले आहे. विशेष म्हणजे अंबानी परिवार हा लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत देखील सहभागी होत असतो. या मुकूटाची किंमत 16 कोटी असल्याचे सांगितले जात आहे.

अनंत अंबानी मानद सदस्य

अंबानी कुटूंब लालबाग राजाच्या दर्शनासाठी आवर्जुन उपस्थिती लावते. अशातच यंदाच्या वर्षी अंबानी कुटुंबातील एका सदस्याची लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील एका मानाच्या पदी नियुक्ती करण्यात आली आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकारी मंडळात रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी यांची मानद सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महिन्याभरापूर्वी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एकमतानं हा निर्णय घेण्यात आला.(Ganesh chaturthi 2024 )

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+