Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मराठी कलाकारांच्या घरी विराजमान झाले बाप्पा, राज्यभरात गणरायांचे मनोभावे स्वागत

Ganesh Chaturthi 2024 Marathi Actor : देशभरात आज लाडक्या बाप्पाचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. मराठी चित्रपटसृष्टी आणि बाॅलिवूडमधील अनेक कलाकारांच्या घरी दरवर्षी बाप्पाचं आगमन होते. अनेक मराठी कलाकारांच्या घरी देखील गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सध्या सगळीकडे गणपती बाप्पाच्या आगमनामुळे जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं आहे.

भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. भारतातच नव्हे तर जगभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बाप्पाचं आगमन झालं आहे.

Swapnil Joshi-Sonali Kulkarni

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि तिचा भाऊ दरवर्षी बाप्पाची सुबक मूर्ती घडवतात. या घरच्या बाप्पाची मूर्ती घडवून सोनालीने मनोभावे पूजा केली आहे. तसेच फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.

'ठरलं तर मग' फेम अमित भानुशालीने ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचं स्वागत केलं आहे. यावेळी त्याच्याबरोबर आई, पत्नी व मुलगा देखील उपस्थित होते.

अभिनेत्री सायली संजीवच्या घरी देखील बाप्पा विराजमान झाले आहेत. सायलीने घरच्या बाप्पाची झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. आई कुठे काय करते?' मालिकेतील संजना हे पात्र साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले भोसलेच्या घरीही गणपतीचे आगमन झाले आहे.

शशांक केतकर, अंकिता लोखंडे, जुई गडकरी, सुयश टिळक, सुशांत शेलार या सगळ्या कलाकारांनी आपल्या घरी बाप्पाचं मनोभावे स्वागत केलं आहे. मराठी कलाकारांप्रमाणे अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींच्या घरी सुद्धा बाप्पाचे आगमन झाले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+