Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

बाबा सिद्दीकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली, गुरमेतला पोलिस कोठडी, अन्य आरोपींचे काय

Baba Siddique Murder case : बाबा सिद्दीकीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले गुरमेल सिंग आणि धर्मराज कश्यप यांना मुंबई गुन्हे शाखेने आज न्यायालयात हजर केले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना मास्क घालून न्यायालयात हजर केले होते. सुनावणीदरम्यान मुंबईतील गुन्ह्यातील दोन्ही गुन्हेगारांना कोठडी देण्याची मागणी केली.

यादरम्यान एक आरोपी धर्मराज कश्यपने स्वतःला अल्पवयीन घोषित केले. कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान धर्मराज कश्यपने दावा केला की, तो अल्पवयीन असून त्याचे वय अवघे 17 वर्षे आहे. त्यानंतर न्यायालयाने धर्मराज कश्यपला पोलिस कोठडी दिली नाही. कोर्टाने आरोपी धर्मराज कश्यपला ओसीफिकेशन चाचणीनंतर पुन्हा हजर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Baba Siddique  Baba Siddique Death

वय ठरवण्याची ही एक लोकप्रिय पद्धत आहे. दरम्यान, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील चौथ्या आरोपीची ओळख पटली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद जीशान अख्तर असे चौथ्या आरोपीचे नाव आहे. शिवा कुमार आणि मोहम्मद जीशान अख्तर सध्या फरार असून त्यांना पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी 10 टीम तयार केल्या आहेत.

वृत्तानुसार, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील चौथा आरोपी मोहम्मद जशीन अख्तर या वर्षी 7 जून रोजी पटियाला तुरुंगातून बाहेर आला होता. पंजाबच्या पटियाला तुरुंगातच तो लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात आला. मोहम्मद जसीन अख्तर हा पंजाबमधील जालंधरचा रहिवासी आहे.

कोर्टात काय-काय घडलं?

आरोपी धर्मराज कश्यप याने कोर्टात न्यायाधीशांसमोर आपले वय 17 वर्षे असल्याचा दावा केल्यामुळे कोर्टाने त्याच्याकडे आधारकार्डची विचारणा केली. यावेळी आधारकार्ड येईपर्यंत कोर्टाची सुनावणी थांबवण्यात आली. त्यानंतर पुढच्या पाच मिनिटात आरोपीकडे आधारकार्ड सापडलं. त्यात त्याचं वय 19 वर्षे असल्याने ते ग्राह्य धरून आता आम्हाला कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. आरोपीने खोटे आधारकार्ड बनवले असेल तर तेही तपासात स्पष्ट होईल, असंही सरकारी वकील म्हणाले. आरोपीचे वकील आरोपीचे वय 17 वर्षे सांगत आहेत. पण ते सिद्ध करणारे कोणताही कागद किंवा पुरावा त्यांच्याकडे नाही, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.

दरम्यान, आरोपी धर्मराज कश्यप याच्या आधार कार्डनुसार त्याचं वय 21 असल्याचे समोर आले. त्याचं आधारकार्ड कोर्टात सादर करण्यात आलं. यावेळी पोलीस कोठडीसाठी जोरदार युक्तिवाद करण्यात आला. सरकारी वकिलांनी दोन्ही आरोपींची 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली. "ज्यांची हत्या झाली ती सामान्य व्यक्ती नसून राज्यमंत्री राहिलेले आहेत. आरोपी उत्तरप्रदेश आणि हरियाणामधून आले होते. ते पुणे आणि मुंबईत राहिले होते. आरोपींनी रेकी केलेली आहे.

आरोपींना लोकल लेव्हलला मदत करणरे कोण, त्यांना सगळी साहित्य पुरवणारे कोण? याचा तपास करायचा आहे", असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. यावेळी आरोपींकडे तब्बल 28 जिवंत काडतुसे सापडल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात दिली. आरोपी ही हत्या करून शांत बसणार होते की आणखी कोणाची हत्या करायची होती हे तपासायचे आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. "आंतरराष्ट्रीय पातळीवरचा हा तपास करावा लागणार आहे. आम्हाला अनेक बाबी तपासायच्या आहेत. निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. आणखी कोण यांच्या निशाण्यावर आहेत का हे तपासायचं आहे. आरोपीना बंदूक पुरवणारे कोण आहेत, त्यांना फंडिंग कोणी केलेली आहे हे आम्हाला तपासायचे आहे", असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी कोर्टात केला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+