Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

महिलेवर सातत्याने अत्याचार, श्रीरामपूरच्या माजी आमदारास बेड्या, मध्यरात्री अटकेचा कसा रंगला थरार!

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरच्या माजी आमदारास महिला अत्याचार प्रकरणी अटक करण्यात आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भानुदास मुरकुटे असे अटक करण्यात आलेल्या माजी आमदाराचे नाव आहे. राहुरी पोलिसांनी सोमवारी मध्यरात्रीच्या दरम्यान मुरकुटे यांना त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेतले यावेळी चांगलाच थरार पाहायला मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.

विविध ठिकाणी बोलावून अत्याचार केल्याचा आरोप

याबाबत अधिक माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील एका महिलेने अत्याचार प्रकरणी सोमवारी संध्याकाळी फिर्याद दाखल केली होती. 2019 पासून मुंबई, दिल्ली तसेच जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. पिडीत महिलेच्या फिर्यादीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आले.

Former MLA Bhanudas Murkute

राहुरी पोलिसांनी केली अटक, या कलमातंर्गत गुन्हा

श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यावर आयपीसी कलम 376,328,418,506 अन्वये राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलीस मुरकुटे यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. मात्र कामानिमित्त मुंबई येथे गेले होते. ते रात्री उशिरा श्रीरामपूर शहरात दाखल झाले. रात्री साडेअकराच्या दरम्यान राहुरी पोलिसांनी मुरकुटे यांना त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. तर या घटनेमुळे अहिल्यानगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+