मुंबईचे माजी CP संजय पांडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश! कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार? वाचा
Former Mumbai Police Commissioner Sanjay Pandey joins :विधानसभा निवडणुकीला आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. लवकरच तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. अशातच अनेक इच्छुक उमेदवारांनी आपापल्या विधानसभांमध्ये मोर्चेबांधणी सुरु केली आहे. तर काहींनी तिकीट मिळेल या शक्यतेने थोड्या फार प्रमाणात का असेना पण प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. ते काॅंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात हा पक्ष प्रवेश पार पडणार आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी याबाबतची पोस्ट करून माहिती दिली आहे.

संजय पांडे यांनी पोलिस दलातील सेवेनंतर राजकारणात उतरणार असल्याचे सांगितले. याबाबत त्यांनी वेळोवेळी इच्छा देखील व्यक्त केली. त्यांनी ऑगस्ट महिन्यात आपल्या प्रचाराचा नारळ फोडत मुंबई उपनगरातील वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे घोषित केले होते. पण ते कोणत्या पक्षातून निवडणूक लढणार? हे जाहीर केले नव्हते मात्र सचिन सावंत यांच्या पोस्टमुळे अखेर संजय पांडे यांनी महाविकास आघाडीत प्रवेश केला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोण आहेत संजय पांडे?
संजय पांडे यांनी कानपूर आयआयटीमधून आयटी कम्प्युटरमध्ये इंजिनीअरिंगचे पदवी घेतली आहे. हे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांची पहिल्यांदा पुण्यात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. यानंतर त्यांची मुंबईतील डीसीपी रँकचे अधिकारी झाले. संजय पांडेंनी 1992 मध्ये मुंबईतील दंगलीच्या वेळी धारावीमधील दंगल नियंत्रण आणि सामाजिक एकोप्या राखण्यासाठी पहिल्यांदा मोहल्ला समितीची स्थापना केली. तर 1992- 93 दरम्यान, दंगलीच्या वेळी संजय पांडे यांनी चांगले काम केल्याचा उल्लेख श्री कृष्ण आयोगाच्या अहवालात देखील करण्यात आला होता.
संजय पांडेंनी 1997 मध्ये इकॉनॉमिक ऑफेन्स विंगमध्ये असताना अभ्युदय बँक घोटाळा, चमडा घोटाळ्याचा तपास करून त्यात झालेल्या भ्रष्टाचाराचा खुलासा केला होता. संजय पांडे यांनी 1998 मध्ये हॉवर्ड विद्यापीठातून पुढील पदव्युत्तर शिक्षण घेतले. संजय पांडे यांनी 2001 मध्ये राजीनामा दिला होता. यानंतर 2005 मध्ये पांडे हे पुन्हा सेवेत रुजू झाले होते.
मध्यंतरी त्यांनी 20 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्तीची इच्छा व्यक्त केली होती. पण न्यायालयीन लढाईनंतर 2011 मध्ये २०१५ मध्ये पांडेंना होमगार्डचे अतिरिक्त पोलीस महासंचालक बनले होते. आणि यानंतर संजय पांडेंनी 9 एप्रिल रोजी महाराष्ट्राचे महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली.
फोन टॅपिंग प्रकरणात झाली होती अटक
संजय पांडे यांची सेवा काही काळ वादग्रस्त ठरली. सप्टेंबर 2022 मध्ये कथित फोन टॅपिंग प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना दिल्ली उच्च न्यायालयातून जामीन मिळाला.












Click it and Unblock the Notifications