माजी आमदार गोपाल अग्रवाल यांचा भाजपला रामराम! 13 सप्टेंबरला काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
Former MLA Gopal Agarwal resigns from bjp :गोंदिया विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार गोपाल दास अग्रवाल यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देत 13 सप्टेंबरला गोंदियात वरिष्ठ कॉग्रेस नेत्याच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश करणाची घोषणा आज घेतलेल्या पत्रपरिषदेत केली आहे
गोंदिया जिल्हा सहसा फार चर्चेत नसतो. निसर्गाने भरभरून दिलेला हा जिल्हा शांत असतो. पण, सध्या या जिल्ह्यातील भाजपचे नेते तथा माजी आमदार गोपालदास अग्रवाल कॉंग्रेससचा हात हाती घेणार आहेत. त्यामुळे हा जिल्हा चर्चेत आला आहे.

काँग्रेसकडून 5 वेळा आमदार
कॉग्रेस पक्षाकडून सतत 5 वेळा आमदार राहिलेले गोपाल अग्रवाल यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भरतीय जनता पक्षात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रवेश करीत गोंदिया विधानसभेचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर गोंदिया विधानसभेची निवडणूक लढविली होती, मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. तर गेल्या पाच वर्षात भारतीय जनता पक्षात राहून सुद्धा आणि सत्तेत सहभागी असताना सुद्धा हव्या त्या प्रमाणात गोंदिया विधानसभेचा विकास न करता आल्याने आगामी विधानसभा निवडणुका पाहता कॉग्रेस पक्षात घर वापसी करीत असल्याचे माजी आमदार गोपाल दास अग्रवाल यांनी आज पत्र परिषद सांगितले आहे
गोंदिया जिल्हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा गृहजिल्हा आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रफुल्ल पटेल हेसुद्धा गोंदिया जिल्ह्यातीलच. 2019 च्या विधानसभा निवडणुकी दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गोपालदास अग्रवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर गोपालदास अग्रवालसुद्धा भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू झाली. आणि नेमके तसेच झाले. पण प्रवेशानंतर गोपालदास अग्रवाल भाजपमध्ये फारसे रुळले नाहीत.
आता पुन्हा स्वगृही परतणार
सध्या गोंदिया जिल्ह्यातील भाजपमध्ये दोन अग्रवालांचे दोन गट पाहायला मिळत आहेत. गोंदिया जिल्ह्यात भाजपच्या अंतर्गत राजकारणामुळे गोपालदास नाराज आहेत. पंधरा दिवसांपूर्वी पार पडलेल्या गोंदिया जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांनी त्यांना प्रश्न मांडण्यापासून रोखले होते. यामुळे त्यांनी नियोजन समितीच्या सदस्यपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. त्यानंतरच ते भाजपला लवकरच रामराम करतील अशी चर्चा जिल्ह्याच्या वर्तविली जात होती.
काँग्रेसकडून मिळू शकते उमेदवारी
गोपालदास अग्रवाल यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाला दिल्ली येथून श्रेष्ठींनी सुद्धा त्यांना हिरवी झेंडी दाखविल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांनी घरवापसी करण्याचा निर्णय घेतला आहे. गोपालदास अग्रवाल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेण्यापूर्वी त्यांचे निकटवर्तीय, वरिष्ठ नेते, पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी सखोल चर्चा केल्याची माहिती आहे. त्यांना कॉंग्रेसकडून विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळू शकते.












Click it and Unblock the Notifications