पुण्यात अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकाचा गोळीबार, कारण ऐकून पोलिसांनाही बसला धक्का
पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे, कोयता गॅंगची दहशत, गोळीबाराच्या घटना, वाहनांच्यातोडफोडीच्या घटना शहरातअधूमधून होत असतात. पोलिसांनी आतापर्यंत अनेक गुन्हेगारांवर कारवाई केली आहे पण, त्यानंतर गुन्हे रोखण्यात म्हणावे तसे यश यत नाही.
आता पुण्यातील गोळीबाराचा वेगळाच प्रकार समोर आला आहे. पुणे शहरात अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकाकडे पिस्तूल होते. ते पिस्तूल लोड करत चुलत भावाने गोळीबार केला, मात्र या गोळीबाराचे कारण समजल्यावर पोलिसांनाही धक्का बसला.

नेमका प्रकार काय आहे?
विनोद नढे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) पक्षाचे माजी नगरसेवक आहेत. विनोद आणि त्यांचा चुलत भाऊ सचिन नढे हे दोघे राहुल बार अँड खुशबू हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर दारु पीत बसले होते. त्याच दरम्यान विनोद नढे यांना त्यांच्या चुलत्याचा फोन आला. कशाला फिरतो काळजी घेत जा? असा सल्ला चुलत्याने दिला. त्यावर विनोद नढे यांनी सांगितले की, काळजी करु नका, माझ्याकडे सुरक्षेसाठी पिस्तूल आहे.
विनोद नढे याचा संवाद ऐकून चुलत भाऊ सचिन नढे याने गंमतीत म्हटले, खरंच तुझ्याकडे पिस्तूल आहे का? मग त्यानंतर विनोद नढे याने पिस्तूल काढून दाखवली. त्यानंतर सचिन नढे याने पिस्तूल लोड करून थेट गोळीबार केला. ती गोळी प्लेट ठेवायचा कपाटावर लागली. सुदैवाने शेजारी बसलेल्या व्यक्तीला ही गोळी लागली नाही. नाहीतर मोठा अनर्थ घडला असता. गोळीबार झाल्यानंतर हॉटेल मधील ग्राहक घाबरून पळून गेले.या गोळीबार प्रकरणी विनोद नढेसह सचिनला वाकड पोलिसांनी अटक केली आहे.
गाडी धुण्यावरुन शेजा-याचे बोट तोडले
पुण्यात एका सोसायटीच्या आवारात गाडी धुतल्याप्रकरणी एकाने दुसऱ्या राहिवाशाला मारहाण करून त्याच्या हाताचे बोट तोडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार तन्मय भार्गव हे विमाननगर परिसरातील एका मोठ्या सोसायटीत राहतात. ते त्यांच्या सोसायटीतील पार्किंगमध्ये त्यांची गाडी धूत होते.
यावेळी अमोल देवरे याने त्यांना पार्किंगमध्ये कार धुण्यास विरोध केला. त्यावर भार्गव यांनी उत्तर दिले की, तुम्ही गाडी तुमच्या पार्किंगमध्ये धुतली ते चालतं का? यावरून देवरे व भार्गव यांच्यात मोठा वाद झाला. हा वाद वाढत गेला. यात देवरे याने भार्गव यांच्यावर हल्ला करत त्यांना मारहाण केली. या मारहाणीत भार्गव यांच्या हाताचे बोट फ्रॅक्चर झाले.(Former corporator vinod nadhe of NCP Ajit Pawar group shot dead in Pune)












Click it and Unblock the Notifications