Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भाजपच्या माजी नगरसेवकाने पोलीस ठाण्यातच विष पिलं; वाल्मिक कराडचे नाव..नेमकं काय घडलं!

Former BJP corporator Bharat Jadhav attempted suicide : नवी मुंबईतील भाजपच्या माजी नगरसेवकाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. भरत जाधव असे या नगरसेवकाचे नाव आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलिस ठाण्यात हा प्रकार घडला. भरत जाधव यांनी विष पिण्याच्या आधी आपली फसवणूक झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यात त्यांनी गंभीर आरोप केले. तर वाल्मिक कराड सारखी प्रवृत्ती समाजात फोफावत चालली असल्याचा आरोप त्यांनी केला.

रुग्णालयात उपचार सुरू

नेमक्या कोणत्या प्रकरणामुळे नगरसेवक भरत जाधव यांनी आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलावे लागले. हे अद्याप समजू शकलेले नाही. विष प्यायल्यानंतर भरत जाधव यांना त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तातडीने नवी मुंबईच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Bharat Jadhav

व्हायरल व्हिडिओत काय म्हणाले भरत जाधव?

  1. भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांनी आत्महत्याचा प्रयत्न करण्यापूर्वी एक व्हिडिओ शेअर केला. त्यात ते म्हणाले की, मी आज प्रचंड मानसिक तणावात हे पाऊल उचलत आहे. कारण समाजामध्ये वाल्मिक कराडच्या सारखी प्रवृत्ती इतकी वाढत चालली आहे की, तुम्ही प्रामाणिकपणे कामच करु शकत नाही. मी प्रामाणिकपणे व्यवसाय करत होतो, त्यामध्ये मला त्रास झाला. 25 वर्षांच्या राजकारणात इतर राजकारण्यांप्रमाणे मी चुकीच्या पद्धतीने पैसे कमावले, असे कोणीही सांगून दाखवावे.
  2. चार-पाच वर्षांपूर्वी कर्जत-जामखेड तालुक्यात बिल्डींगचं काम सुरु केलं. रमेश आसबे, युनुस सय्यद, बेबीचंद धनावडे आणि मी. रमेश आसबेचं आणि सचिन घायवळ व निलेश घायवळचा काय वाद झाला मला माहिती नाही. मात्र, अडीच-तीन वर्षे त्यांनी दहशतीच्या जोरावर बिल्डींगचं काम बंद पाडले आहे. निलेश घायवळ आणि सचिन घायवळ यांच्या दोन-तीन गाड्या साईटवर येतात, 30-40 पोरं उतरतात. त्यामुळे या बिल्डींगचं एकही बुकिंग होत नाही. आज जवळपास तीन-चार कोटी टाकून, बँकेचे कर्ज घेऊन मी नुकसान सहन करत आहेत. सहन होत नाही, अशी ही गोष्ट झाली आहे. बँकेचे कर्ज आणि व्याज हे सुरु आहे.
  3. जामखेडच्या भूम तालुक्यात एक प्लांट आहे. हे लोक आपल्याला त्रास देतील, हे मला माहिती आहे, म्हणून मी तिकडे काम सुरु केले. एका कामात बीडचे मुन्नाभाई आणि संदीप आगमने यांना पार्टनर म्हणून घेतलं, त्यांनी 90 लाख रुपये लावले आणि दहा-बारा महिन्यांत 60 लाख रुपये नफा घेतला. पाच-दहा लाखांवरुन भांडणं, मारामाऱ्या केल्या, माझ्या दुसऱ्या पार्टनरला मारहाण केली. मी म्हणालो, देऊन टाका, भांडण नको. त्यानंतर जीएसीटीची बिलं देताना त्यांनी बोगस बिलं दिली. त्यामुळे आमच्या कंपनीला त्रास सहन करावा लागत आहे, आमची काहीही चूक नसताना.

नरेंद्र झुरानी नावाच्या व्यक्तीवर केले गंभीर आरोप!

नरेंद्र झुरानी प्रकरणातही असेच घडले, हे प्रकरण खूपच विचित्र आहे. मी नवी मुंबईत ज्याला लहानाचा मोठा केला, ज्याला नावारुपाला आणला, ज्याला समाजात वावरायचं शिकवलं, कामं घेऊन दिली, पैसे दिले. त्याचा हिशेब करताना एका राजकीय नेत्याच्या, कधी दुसऱ्याच्या आश्रयाला जायचं. या नरेंद्र झुरानीला दत्ता घंगाळे यांनी पाच लाख रुपये घेऊन भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सचिव करण्यात आले, काहीही संबंध नसताना. त्यांना राजाश्रय दिला, व्यवसायात पार्टनर झाले. त्यांचा काय व्यवसाय आहे माहिती नाही पण कोट्यवधींच्या जमिनी ते विकत घेत आहेत. दत्ता घंगाळे यांनी मला गँगवॉरची धमकी दिली.

भरत जाधव व्हायरल व्हिडिओत म्हणाले की, नरेंद्र झुरानी मला फसवत आहे, हे त्याच्या कुटुंबीयांना माहिती आहे. दत्ता घंगाळेची बायको माझी कॉलर पकडून मला धमकावते. बदनामी करायला, टार्गेट करायला मर्यादा असते. विशाल डोळस, अभिलाष मॅथ्यू, सचिन शिंदे, अनिकेत हे मला भररस्त्यात शिव्या देतात, त्रास देतात. त्यांच्या कोणत्याही आर्थिक विषयात मी कधीही पडलेलो नाही.

सरकारने नरेंद्र झुरानी यांनी केलेल्या कामाची आणि वॉर्ड नंबर 108 मधील केलेल्या कामांची चौकशी करावी. कर्जत-जामखेड तालुक्यात मी कोट्यवधी रुपये टाकून जमीन घेतली. यामध्ये अनेकांनी कमिशन घेतलं. दत्ता पवार, रुपेश पवार यांनी झाडाचे आणि रस्ता काढून देण्याचे पाच-सात लाख रुपये घेतले. आता माझ्याच जमिनीला जाणारा रस्ता खोदून टाकला. जेणेकरुन मला जमीन विकता येऊ नये, असे भरत जाद यांनी व्हिडीओत म्हटले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+