धक्कादायक! अंगणात खेळणाऱ्या 5 वर्षीय मुलीला उचलून घरी आणत शेजाऱ्याचा अत्याचार, मुंबईतील घटन
उरण मधील घटना ताजी असतानाच मुंबईमधून देखील एक धक्कादायक घटना समोर आली आहे मुंबईत पाच वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. मुंबईतील आरएके मार्ग पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईच्या शिवडी परिसरात राहणाऱ्या पाच वर्षीय मुलीवर शेजारीच राहणाऱ्या एका इसमाने अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे.

चिमुरडी अंगणात खेळत असताना तिला उचलून स्वतःच्या घरी घेऊन गेला आणि त्यानंतर तीस वर्षीय शेजारी राहणाऱ्या इसमाने तिच्यावर अत्याचार केला.
याप्रकरणी आरएके मार्ग पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी तीस वर्षीय आरोपीला अटक केली आहे. भारतीय न्याय आणि पोक्सो कायदा अंतर्गत आरोपीला अटक करण्यात आली आहे. अवघ्या पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केल्यामुळे एकच खळबळ उडाली असून नागरिकांमधून संतापाची लाट उसळत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
आरोपीला अटक
मुंबईतील शिवडी येथे घराच्या अंगणात खेळत असलेल्या चिमुरडीवर शेजाऱ्याने उचलून घरी घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार केला होता याप्रकरणी आरएके मार्ग पोलिसांनी सदरच्या 30 वर्षीय आरोपीला अटक केली असून भारतीय न्याय संहितेच्या कलम 65 (2) आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याच्या कलम 4,8 आणि 12 अंतर्गत आरोपीला अटक करण्यात आली आहे.
एका महिन्यात तीन घटना
मुंबई परिसरातून दररोज काही ना काही धक्कादायक घटना समोर येत आहेत. कल्याण शिळफाटा येथे मंदिरात आश्रयासाठी आलेल्या एका महिलेवर मंदिरातील पूजा करणाऱ्या सेवकांनी अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या केली होती. त्यानंतर उरण येथे एका बावीस वर्षीय मुलीची निर्घृण पणे हत्या केली आणि तिच्या मृतदेहाची विटंबना केली होती. विशेष म्हणजे हत्या केलेल्या यशस्वी शिंदे वयाच्या चौदाव्या वर्षी त्याच दाऊद शेख नावाच्या आरोपीने त्रास दिला होता आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल असल्याने तो तुरुंगात होता.
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा यशश्री शिंदेला त्रास देण्यास सुरुवात केली आणि तिची निर्घृणपणे हत्या केली आणि प्रकरण ताजे असतानाच आता मुंबईमधून अवघ्या पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाटा असून आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.












Click it and Unblock the Notifications