एकनाथ शिंदे खेळणार नव्या चेहऱ्यांवर 'डाव'..? 'या' पाच आमदारांची नावे मंत्रीपदासाठी चर्चेत
cabinet expansion- येत्या १४ डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. रविवारी रात्री उशीरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वर्षा बंगल्यावर तासभर चर्चा झाली. त्यात नव्या मंत्रिमंडळाबाबत शिंदे गटाला किती जागा मिळणार याचे सूत्र ठरले. त्यानुसार एकनाथ शिंदे त्यांच्या मंत्र्यांबाबत चाचपणी करत असल्याचेही, काही मिडिया हाऊसचे म्हणणे आहे. शिंदे हे आपल्या मंत्रीमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देतील, असेही काहींचे म्हणणे आहे.

आमदारांची लाँबिंग झाली सुरु
महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे. अनेक आमदार मंत्रीपदासाठी इच्छुक असून, मंत्रिपद मिळावे यासाठी अनेकांनी आत्तापासूनच लॉबिंग सुरु केली आहे. एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेकडून ५ नवीन चेहऱ्यांना मंत्रीपदाची संधी देणार असल्याच्याही बातम्या आहेत. त्यापूर्वीच शिंदे गटाच्या आमदारांनी लाँबिंग सुरु केली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे कोणत्या पाच नावांना संधी देतात, हे लवकरच कळणार आहे.
येत्या १४ डिसेंबरला होणार शपथविधी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या १४ डिसेंबरला मंत्रीमंडळ विस्तार केला जाणार आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात रात्री बैठक पार पडली. या बैठकीत मंत्रिमंडळ खात्याच्या वाटपावरून चर्चा करण्यात आली. यानंतर आज मंत्रिमंडळ विस्ताराच्या बाबतीत एक अंतिम बैठक होईल, असे बोललं जात आहे. त्यातच आता मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाकडून दोन मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे. तर ५ नवीन आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळणार आहे.
कुणाची नावे आली चर्चेत?
शिवसेना शिंदे गटाच्या माजी आणि संभाव्य मंत्र्यांची नावे समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माजीमंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट केला जाणार असल्याची चर्चा आहे. गेल्या मंत्रिमंडळात गुलाबराव पाटील, शंभुराज देसाई, उदय सामंत, तानाजी सावंत, दादा भुसे, दीपक केसरकर यांच्याकडे मंत्रीपदे देण्यात आली होती. यावेळी भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, विजय शिवतारे या पाच जणांना मंत्रिपदाची संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.












Click it and Unblock the Notifications