Breaking News : शिवसेना ठाकरे गटाच्या 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, वाचा- कोणाला कुठून संधी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. यात 65 जणांचा समावेश आहे. वाचा संपूर्ण यादी...कोणाला कुठून मिळाली उमेदवारी.
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत जागावाटपावरुन वाद सुरू होता. परंतु आता हा वाद निवळला असून शिवसेना ठाकरेंच्या वतीने आज पहिली यादी जाहीर करण्यात आली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 23, 2024
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची अधिकृत उमेदवारांची पहिली यादी. pic.twitter.com/QAJ01ce7ds
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांची अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. यात प्रामुख्याने 65 उमेदवारांची घोषणा झाली. दुसरे म्हणजे महाविकास आघाडीतील एकाही पक्षाने अद्यापपर्यंत उमेदवारी जाहीर केलेली नव्हती. तर महायुतीकडून तीन्ही पक्षातील नेत्यांकडून यादी जाहीर झालेली होती. आता महाविकास आघाडीमधून ठाकरे गटाने आघाडी घेत यादी जाहीर केलेली आहे. दुसरे म्हणजे आज सकाळपासून मातोश्रीवर बैठकांचे सत्र सुरू होते. तर अनेक उमेदवारांना एबी फॉर्म देखील वाटप करण्यात आलेले होते. तर सायंकाळी ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने ट्विटरवर ही यादी जाहीर करण्यात आली.
मतदारसंघ अन् उमेदवारांची नाव
चाळीसगाव - उन्मेश पाटील
पाचोरा- वैशाली सूर्यवंशी
मेहकर - सिद्धार्थ खरात
बाळापूर - नितीन देशमुख
अकोला पूर्व - गोपाल दातकर
वाशिम - डॉ. सिद्धार्थ देवळे
बडनेरा - सुनील खराटे
रामटेक - विशाल बरबटे
वणी - संजय देरकर
लोहा- एकनाथ पवार
कळमनुरी - डॉ. संतोष टारफे
परभणी - डॉ. राहुल पाटील
सिल्लोड- सुरेश बनकर
कन्नड- उदयसिंह राजपूत
संभाजीनगर मध्य- किशनचंद तनवाणी
संभाजीनगर प.- राजू शिंदे
वैजापूर - दिनेश परदेशी
नांदगाव- गणेश धात्रक
मालेगाव बाह्य - अद्वय हिरे
निफाड- अनिल कदम
नाशिक मध्य- वसंत गिते
नाशिक पश्चिम- सुधाकर बडगुजर
पालघर- जयेंद्र दुबळा
बोईसर- डॉ. विश्वास वळवी
भिवंडी ग्रामीण- महादेव घाटळ
अंबरनाथ - राजेश वानखेडे
डोंबिवली- दिपेश म्हात्रे
कल्याण ग्रामीण- सुभाष भोईर
ओवळा-माजिवडा - नरेश मणेरा
कोपरी-पाचपाखाडी- केदार दिघे
ठाणे- राजन विचारे
ऐरोली- एम.के. मढवी
मागाठाणे- उदेश पाटेकर
विक्रोळी- सुनील राऊत
भांडूप पश्चिम - रमेश कोरगावकर
जोगेश्वरी पूर्व- अनंत नर
दिंडोशी- सुनील प्रभू
गोरेगाव- समीर देसाई
अंधेरी पूर्व- ऋतुजा लटके
चेंबूर- प्रकाश फातर्फेकर
कलीना- संजय पोतनीस
वांद्रे पूर्व- वरुण सरदेसाई
माहीम- महेश सावंत
वरळी- आदित्य ठाकरे
कर्जत- नितीन सावंत
उरण- मनोहर भोईर
महाड- स्नेहल जगताप
नेवासा - शंकरराव गडाख
गेवराई- बदामराव पंडित
धाराशिव- कैलास पाटील
परांडा- राहुल पाटील
बार्शी- दिलीप सोपल
सोलापूर दक्षिण- अमर पाटील
सांगोले- दिपक साळुंखे
पाटण- हर्षद कदम
दापोली- संजय कदम
गुहागर- भास्कर जाधव
रत्नागिरी- सुरेंद्रनाथ माने
राजापूर- राजन साळवी
कुडाळ- वैभव नाईक
सावंतवाडी- राजन तेली
राधानगरी- केपी पाटील
शाहूवाडी- सत्यजीत पाटील












Click it and Unblock the Notifications