नवी मुंबई विमानतळावर उरतलं पहिलं विमान, चाचणी यशस्वी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या धावपट्टीवर आज शुक्रवारी वायुदलाच्या लढाऊ विमानाचं यशस्वी लँडिंग करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही पहीली चाचणी यशस्वीरित्या पार पडली. भारतीय वायूदलाचं सी-295 या विमानाने आकाशात काही वेळ घिरट्या घेतल्यानंतर धावट्टीवर यशस्वीरित्या लॅण्डींग केलं. धावपट्टीच्या बाजूने पाण्याचे फवारे उडवून विमानाला मानवंदना देखील देण्यात आली. 2025 पर्यंत या विमानतळावरून देशांतर्गत विमान वाहतूक सुरू होईल, असं सरकारकडून सांगण्यात आले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा
महायुती सरकार व सिडकोला आचारसंहितेपूर्वी तीन महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावायचे आहेत. 26 हजार महागृहनिर्माण प्रकल्पाची सोडत, खालापूर येथील इर्शाळवाडी येथे आदिवासी बांधवांना घरांचे वाटप आणि तिसरा प्रकल्प म्हणजे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन विमानांच्या चाचण्या. या तीन प्रकल्पातील विमातळाच्या धावपट्टीची पहिली चाचणी आज यशस्वी झाली.

हवाई दलाच्या सूखोई विमानाने धावपट्टीवरून उड्डाण घेतलं. काही वेळ आकाशात उड्डाण करून ते विमान धावपट्टीवर उतरलं. हा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत करण्याचे नियोजन होते. मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून मोदींची वेळ न मिळाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
दरवर्षी नऊ कोटी प्रवासी प्रवास करतील : फडणवीस
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे शिवडी न्हावाशेवा सी लिंक, मुंबई तसेच नवी मुंबई मेट्रो, दोन खाडी मार्गाने जोडला जात असून तो देशातील एक विशेष प्रकल्प ठरणार असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. या विमानतळावरून 9 कोटी प्रवासी दर वर्षी प्रवास करतील असा दावाही फडणवीसांनी केला होता. 2025 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होऊन देशांतर्गत वाहतूक येथून सुरु होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.












Click it and Unblock the Notifications