तो फोटो, ती कॅप्शन... फॅन्ड्रीतील राजेश्वरीवर नेटकरी संतापले; म्हणाले, काळी चिमणी गेली, पण का? वाचा
'फॅण्ड्री' चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री राजेश्वरी खरात पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेली राजेश्वरी खरात आता पुन्हा एकदा तिच्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे. यावेळी ती तिच्या नव्या धार्मिक प्रवासामुळे चर्चेत असून या पोस्टनंतर तिचे अनेक चाहते संतप्त झाल्याचे पहायला मिळत आहे.

नेमकं काय झालं?
राजेश्वरीने खरात हिने आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केलाय. या फोटोवरुन ती धर्मांतर करत असल्याचा अंदाज लावता येतो. तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याची माहिती मिळत आहे. त्या फोटोत ती पाण्यात उभी असून, हात जोडलेले दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने "बाप्तिस्मा स्वीकारलं" असं लिहिलं आहे. याचबरोबर तिने एक ग्रुप फोटो देखील शेअर केला असून, त्यात ती काही लोकांसह दिसून येते.
कोणता धर्म स्विकारला?
तिच्या पोस्टमध्ये बायबलमधील एक विधान देखील नमूद केलं आहे "परमेश्वर म्हणतो की, माझ्याकडे तुमच्यासाठी योजना आहेत, ज्या मला माहित आहेत." असं तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहीलं आहे. तसेच "#NewBeginning" आणि "#Baptized" हे हॅशटॅग वापरून आपल्या नव्या जीवनाची सुरुवात कशी आहे, हे स्पष्ट केलं आहे. या सगळ्या पोस्टवरून हे स्पष्ट होतं की, राजेश्वरीने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला आहे.
चाहत्यांचा कमेंट्सचा पाऊस
राजेश्वरीच्या खरातच्या या पोस्टनंतर तिच्या चाहत्यांनी कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला. राजेश्वरीच्या या निर्णयावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेक युजर्सनी तिच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. एका युजरने म्हटलं, "ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करण्याऐवजी भारतीय आणि सुंदर असा बुद्धांचा धम्म असतानाही तुला दुसऱ्या धर्माची गरज भासावी हे दु:खद आहे. बाबासाहेबांनी २५ वर्षे अभ्यास करून जे सांगितलं, त्याचा काही अर्थच राहिला नाही." काहींनी "काळी चिमणी गेलीस" अशा प्रकारच्या टीका केल्या आहेत. काहींनी तिला अनफॉलो केल्याचीही माहिती दिली आहे.












Click it and Unblock the Notifications