धक्कादायक..! 'त्या' प्रसिद्ध बैलगाडा मालकाचा खून; खंडणी मागितल्यावर मृतहेद जाळून लावली विल्हेवाट
Bullock Cart Owner Murdered- बैलगाडा मालकाचे अपहरण करुन त्याचा मृतदेह जाळून टाकण्याची धक्कादायक घटना मावळमध्ये घडली. या प्रकारानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी अपहरण हे खंडणीसाठी करण्याचा बनाव करण्यात आला. तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन आरोपी सूरज वानखेडे या तरुणाला बेड्या ठोकल्या. बैलगाडा मालक पंडीत जाधव असे मृताचे नाव आहे.

नेमका कसा घडला थरार
प्रसिद्ध बैलगाडा मालक मृत पंडित जाधव हे 14 नोव्हेंबरपासून बेपत्ता झाले होते. त्यांचे अपहरण झाल्यानंतर त्यांच्याच मोबाईलवरुन त्यांच्या कुटुंबियांना व्हाट्सॲपद्वारे 50 लाखांची खंडणी मागण्यात आली होती. कुटुंबियांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेत हा प्रकार सांगितला. त्यानंतर तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी पंडीत जाधव यांच्या बंद मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण सुरु केले. परिसरातील आसपासच्या सीसीटीव्हीचे फुटेजही तपासण्यात आले. तांत्रिक तपासाद्वारे व खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांसमोर सूरज वानखेडे या तरूणाचा शोध सुरु केला.
आरोपीला ठोकल्या बेड्या
पोलिसांनी संशयीत सुरज वानखेडे याचा कसून तपास केला. गावी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच सूरजने गुन्हा कबूल केला. सूरजने त्याचा मित्र रणजित (रा. बिहार) याच्यासोबत प्रसिद्ध बैलगाडा मालक पंडीत जाधव यांचे अपहरण केले होते. त्यांच्या कुटुंबियांकडून लाखोंची खंडणीही मागितली होती. अपहरण केल्याच्या रात्रीच म्हणजेच 14 नोव्हेंबरला तळेगाव एमआयडीसी परिसरात त्याचा गळा आवळून खून केला असे सूरजने पोलिसांना सांगितले.
मृतहेहाची कशी लावली विल्हेवाट
आरोपींनी मृत पंडीत जाधव याच्या कुटुंबियांकडे जात पंडीतने त्याची फाँर्चूनर गाडी मागितली आहे, असे सांगितले. कुटुंबियांनी गाडीची जावी दिल्यावर त्याच कारमध्ये पंडीत जाधव यांचा मृतदेह आरोपींनी टाकला. वहागाव (ता. खेड) येथील डोंगरावर हा मृतदेह जाळून त्याची विल्हेवाट लावली. एवढंच नव्हे तर मृतदेहाची विल्हेवाट लावल्यावर त्यांची गाडी पुन्हा जाधव यांच्या घराच्या परिसरातच लावल्याचेही तपासात निष्पन्न झाले. अखेर तळेगाव MIDC पोलिसांनी आणि खंडणी विरोधी पथकाने दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्यात.












Click it and Unblock the Notifications