Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'लाडक्या बहि‍णीं'चा डिसेंबरचा हप्ता कधी..? 1500 की 2100..? फडणवीसांनी दिली सगळ्या प्रश्नांची उत्तरे

लाडकी बहिण योजना हा फक्त इलेक्शन जुमला आहे, असा आरोप विरोधकांनी निवडणुकीपूर्वी केला होता. मात्र ही योजना कायम स्वरुपी चालू राहील, असे महायुतीने छातीठोकपणे सांगितले होते. महायुतीला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विक्रमी यशात, लाडकी बहिण योजना गेमचेंजर ठरलेली दिसली. आता या योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी येणार, या प्रश्नाचे उत्तर आज देवेंद्र फडणवीसांनी दिले.

Devendra Fadnavis

देवाभाऊंनी दिली बहिणींना खुशखबर

नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात देवेंद्र फडणवीसांनी आज लाडकी बहिण योजनेवरही भाष्य केले. त्यापूर्वी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. आम्ही निवडणुकीत दिलेली सगळी आश्वासने पूर्ण करणार आहोत. जे सांगतो ते आम्ही करतोच, अशा शब्दात फडणवीसांनी विरोधकांना ठणकावलं. त्यानंतर लाडकी बहिण योजना सुरुच राहणार आहे. कुणीही यावर शंका घेऊ नये, असे म्हणत त्यांनी या योजनेच्या अफवांना उत्तर दिले.

डिसेंबरचा हप्ता कधी येणार?

आमची निवडणुकीपूर्वी सुरु असलेली एकही योजना निवडणुकीनंतर बंद होणार नाही. कुणीही कोणत्याही योजनेबाबत शंका घेऊ नये, असे म्हणत फडणवीसांनी डिसेंबरच्या हप्त्याबाबत माहिती दिली. सध्या सुरु असलेले हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणीचे डिसेंबर महिन्याचे पैसे यायला सुरुवात होईल, असे मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केले. लाडकी बहिण योजनेच्या कोणत्याही निकषात बदल करण्यात आलेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

योजनेचे निकष आहे तेच

फडणवीस म्हणाले, आमची एकही योजना बंद होणार नाही. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळतील. या योजनेच्या कोणत्याही निकषात बदल करण्यात आलेले नाहीत, असेही फडणवीसांनी स्पष्ट केलं. ज्यांनी अर्ज केला त्या सर्वांना पैसे देत आहोत, असं त्यांनी सांगितलं. ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न वर्षाला अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+