Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये व घरेही मिळणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली योजना

गेल्या विधानसभेला गेमचेंजर ठरलेली लाडकी बहिण योजना आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लाडक्या बहि‍णींनी महायुतीला पुन्हा सत्तेत आणले, असे महायुतीच्या नेत्यांनी अनेकदा बोलून दाखवले आहे. आता याच लाडक्या बहि‍णींसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आणखी एक योजना प्रायोजित असल्याचे सांगितले.

Devendra Fadnavis

लाडकी बहिण ठरली चर्चेची

विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने महिलांना महिन्याला दीड हजार रुपये देत मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरु केली होती. आचारसंहिता लागण्यापूर्वी महिलांच्या खात्यात पाच महिन्याचे पैसेही जमा झाले होते. याच योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून सुमारे सव्वा दोन कोटी महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला. हिच लाडकी बहिण विधानसभा निवडणुकीतही गेमचेंजर ठरली. बहि‍णींनी हातभार लावल्यानंतर महायुतीची एकहाती सत्ता आली.

फडणवीसांनी नवी घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात होते. पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना फडणवीसांनी लाडक्या बहि‍णींसाठी आणखी एक आनंदाची बातमी सांगितली. ते म्हणाले, नव्या महायुती सरकारला केंद्र सरकारकडून एक मोठ्ठं गिफ्ट मिळालं आहे. केंद्राकडून प्रधानमंत्री आवास योजनेच्या वीस लाख घरांना मंजूरी मिळाली आहे. याबाबत केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी नुकतीच घोषणा केली. म्हणजेच महाराष्ट्रात स्वतःचे घर नसणाऱ्यांना वीस लाख घरे मिळणार आहेत. लाडका शेतकरी व लाडक्या बहि‍णींना विशेषतः या योजनेचा लाभ देण्याचा सरकारचा विचार आहे.

मिळणार २० लाख घरे

प्रधानमंत्री आवास योजनेतून एकाच वर्षांत महाराष्ट्रात वीस लाख घरे बांधली जाणार आहेत. बेघरांसाठी ही योजना राबविली जाणार आहे. ज्या लाडक्या बहि‍णींना स्वतःचं हक्काच घर नाही, त्या महिलांचा या योजनेसाठी प्राधान्याने विचार होणार आहे, असं फडणवीसांनी बोलून दाखवलं. त्यामुळे आता लाडक्या बहि‍णींना हक्काचे पैसे व हक्काचं घरही मिळणार आहे. त्याशिवाय लाडक्या बहि‍णींचा १५०० वरुन २१०० रुपये हप्ताही, येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+