Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

संतोष देशमुख हत्या प्रकरण : आठ आरोपींना लागला मोक्का; वाल्मिक कराड का सुटला? वाचा संपूर्ण माहिती

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आठ आरोपींना आज मोक्का लावण्यात आला. सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे, महेश केदार आणि जयराम चाटे यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत खटला चालणार आहे. या प्रकरणातील संशयित वाल्मिक कराड याच्यावर मात्र मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई झाली नाही.

Santosh Deshmukh murder case

राज्यभर मोर्चे सुरुच

या आठही आरोपींवर एसआयटीने मोक्का लावला असून त्यांच्याकडेच या प्रकरणाचा तपास आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना मोक्का लावण्याच्या मागणीसाठी राज्यभर मोर्चे निघत आहेत. आज एसआयटीने या प्रकरणात महत्त्वाचे पाऊल उचलत घुले बंधूसह इतर पाच आरोपींना मोक्का लावला.

कुणावर लागतो मोक्का?

एखाद्या आरोपीने संघटित स्वरुपाची गुन्हेगारी केल्याचे आढळले, तर मोक्का अंतर्गत कारवाई होते. एका व्यक्तीवर मोक्का लागत नाही. मोक्का लावताना गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेतली जाते. गुन्ह्यात दोन किंवा त्यापेक्षा अधिक म्हणजेच टोळी असेल तर मोक्का लागतो. अपहरण, खंडणी, हत्या, अमली पदार्थांची तस्करी यासह गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर मोक्का लावला जातो. मोक्काच्या कलम 3 (1) नुसार आरोपींना किमान 5 वर्ष ते जन्मठेप अशी शिक्षा होऊ शकते. यात आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची देखील तरतूद आहे.

वाल्मिक कराडवर का नाही?

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप होत आहे. मात्र वाल्मिक कराडला सध्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याला अटक झालेली नाही. म्हणून वाल्मिक कराडला मोक्का लावलेला नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास राज्य सरकारने एसआयटी आणि सीआयडीकडे दिला आहे. खुनाच्या गुन्ह्यात कराडचा सहभाग दिसला तर त्याच्यावरही अशीच कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जामीन मिळणार नाही?

मोक्का हा कठोर कायदा समजला जातो. संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी हा कायदा बनवण्यात आला आहे. आरोपीवर एकदा मोक्का लागला, की त्याला सहज जामीन मिळत नाही. आरोपींना तुरुंगातून बाहेर पडता येत नाही. विशेष म्हणजे मोक्का लागलेल्या आरोपींचा खटला विशेष न्यायालयात चालवला जातो. त्यामुळे एसआयटीने केलेली मोक्काची कारवाई महत्त्वाची समजली जाते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+