Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

परळीत EVM मशीन फोडले, येवल्यात भुजबळांना मतदान केंद्रात जाण्यास रोखले, कुठे काय घडलं, वाचा सविस्तर

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात राज्यभरात मतदान होत आहे. दरम्यान, ठिकठिकाणच्या मतदारसंघात सद्या विविध वादाच्या घटना समोर येत आहेत. परळी विधानसभा मतदारसंघात मोठी घटना समोर आली आहे. परळीतील एका मतदान केंद्रावरील EVM मशीनची तोडफोड करण्यात आली आहे. ही तोडफोड कोणी केली यासंदर्भातील माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु सदर घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.


मतदान प्रक्रिया बंद

मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ मतदारसंघातील चार मतदान केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर धुडगूस घालण्यात आला आहे. इथली ईव्हीएम मशिन्स देखील फोडण्यात आली. लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या या घटनांमुळं महाराष्ट्रात हादरला आहे. यामुळं या मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रिया बंद झाली आहे.


नेमकं काय घडलंय?

परळी विधानसभेसाठी बुधवारी सकाळी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. दुपारी बाराच्या सुमारास तालुक्यातील घाटनांदूर येथील सोमेश्वर विद्यालय व जिल्हा परिषद शाळेच्या बुथवरील केंद्राध्यक्ष मुंडे यांना काही युवकांनी मारहाण करत 4 मशीनची तोडफोड केली. यावेळी केंद्राध्यक्ष मुंडे यांना तात्काळ आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

छगन भुजबळ यांना रोखलं

दुसरीकडे येवला विधानसभा मतदारसंघातील येवला शहरातील मतदान केंद्रात राष्ट्रवादीचे नेते तथा उमेदवार छगन भुजबळ यांना जाण्यापासून अधिकाऱ्यांनी रोखले. त्यानंतर छगन भुजबळ यांचा पारा चढलेला पाहायला मिळाला. मी उमेदवार आहे, मला तुम्ही मतदान केंद्रात जाण्यापासून रोखू शकणार नाही, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. दरम्यान, मतदान केंद्रावर काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

Maharashtra Assembly Election 2024

सुहास कांदे अन् समीर भुजबळ आमनेसामने

दुसरीकडे नांदगाव विधानसभा मतदारसंघात सुहास कांदे आणि समीर भुजबळ हे आमनेसामने आले होते. तर सुहास कांदे हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत. त्यांच्या गाड्या रोखल्याने ते आक्रमक झाले. यावेळी बोलताना त्यांनी समीर भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

धुळ्यात पैसे वाटप होत असल्याचा आरोप करून भाजप व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी वंचितच्या एका कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली. त्याला अखेर पोलिसांनी ताब्यात घेत मतदान केंद्राजवळ शांतता प्रस्थापित केली.

दुसरीकडे दारु व पैसे वाटल्याच्या आरोपानंतर ठाकरे गटाचे उमेदवार केदार दिघे व त्यांच्या 8 सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातील हा प्रकार घडला. शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोग व पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.

संजय शिरसाट यांच्याकडून ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला धमकी

शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील उमेदवार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना समोर आली. त्याचा व्हिडिओ विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विट करून ही दादागिरी नाही तर काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नितीन पवार पाटील या कार्यकर्त्याला शिवीगाळ दिली. तर हा प्रकार उस्मानपुरा भागात घडला.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+