Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

एन्काऊंटर स्पेशलिस्ट संजय शिंदेंनी सांगितला अक्षय शिंदेवरील गोळीबाराचा थरार, काय घडलं 45 मिनिटात!

Encounter Specialist Sanjay Shinde on Akshay Shinde : बदलापूरमधील दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेचा सोमवारी रात्री पोलिसांनी एन्काऊंटर केला. ज्यांच्या पिस्तुलातून झाडलेल्या गोळीने शिंदेचा मृत्यू झाला ते पोलिस निरीक्षक आहेत संजय शिंदे. या कारवाईमध्ये संजय शिंदे यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक निलेश मोरे हे ही जखमी झाले आहेत. अक्षय शिंदेवर गोळी झाडणाऱ्या संजय शिंदेंच्या जबाबानंतर मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यात नेमकं काय घडलं, याचा सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

हाती पिस्तुल घेऊन कोणालाही सोडणार नाही अशी अक्षयने धमकी दिली त्यानंतर हवालदार महेश तावडेंच्या दिशेने दोन राऊंड फायर केल्या. त्यामुळे आणखी गोळ्या झाडेल अशी खात्री पटल्याने पोलिसांनी अक्षय शिंदेवर गोळीबार केला, अशी माहिती गोळीबारात जखमी झालेले पोलिस अधिकारी संजय शिंदे यांनी म्हटले. मुंब्रा पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यात विस्तृत या घटनेची माहिती देण्यात आली.

Akshay Shinde  encounter

जबाबात काय म्हणाले संजय शिंदे?

संजय शिंदे आपल्या जबाबात म्हणाले, सोमवारी सकाळी 5.30 च्या दरम्यान कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन अक्षय शिंदेला ताब्यात घेतले. अक्षयला ताब्यात घेतल्यानंतर आम्ही ठाण्याचे दिशेने निघालो. या वेळी मी व्हॅनमध्ये पुढे बसलो होते. तर अक्षय आणि सपोनि निलेश मोरे आणि दोन अंमलदार अक्षयसोबत मागे बसले होते. शिळ डायघर पोलीस ठाण्याजवळ आले असताना निलेश मोरे यांनी मला त्यांच्या मोबाईल फोनवरुन फोन करुन आरोपी अक्षय शिंदे हा मला तुम्ही पुन्हा कशासाठी घेऊन जात आहात? आता मी काय केले आहे?, असे रागाने बोलत असून शिवीगाळ करीत असल्याचे सांगितले.

त्यामुळे मी वाहन थांबवून आरोपीला शांत करण्याच्या उद्देशाने मागे येऊन बसलो. आम्ही सरकारी वाहनाने आरोपी अक्षय शिंदे यास घेऊन मुंब्रा बायपास रोडवर मुंब्रा देवीच्या पायथ्याजवळ आलो. सायंकाळी 6.15 च्या सुमारास आरोपी अक्षय शिंदे हा अचानक निलेश मोरे यांच्या कमरेला पॅन्टमध्ये खोचलेले सरकारी पिस्तुल बळाचा वापर करुन खेचू लागला. अक्षय पिस्तुल हिसकवण्याचा प्रयत्न करत असताना त्याला अडवण्याचा प्रयत्न केला.

म्हणाला मी कोणालाही सोडणार नाही

पिस्तुल हिसकवताना सुरू असलेल्या झटापटीत आरोपी अक्षय शिंदे हा त्यावेळी मला जाऊ द्या, असं म्हणत होता. झटापटीमध्ये सपोनि निलेश मोरे यांचे पिस्टल लोड झाले व त्यातील 1 राउंड हा सपोनि निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीमध्ये घुसल्याने ते खाली पडले. त्यावेळी आरोपी अक्षय शिंदे याने निलेश मोरे यांचे पिस्तुलचा ताबा घेतला. अन् आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही. असा द्वेषाने बोलू लागला. त्यानंतर अक्षय शिंदे यांने माझे व हरिश तावडे यांच्या दिशेने हातातील पिस्तूल रोखून आम्हाला जीवे मारण्याच्या उद्देशाने आमच्यावर 2 गोळ्या झाडल्या. परंतु आमच्या नशिबाने त्या गोळ्या आम्हाला लागल्या नाहीत.

अन् अखेर आम्ही गोळीबार केला

आरोपी अक्षय शिंदेचे देहबोली पाहुन तो त्याच्याकडील पिस्तुलमधून आमच्यावर गोळ्या झाडून आम्हाला जीवे मारणार अशी माझी पूर्णपणे खात्री झाली म्हणून मी प्रसंगावधान राखत स्वसंरक्षणार्थ माझ्याकडील पिस्तुलाने एक गोळी आरोपी अक्षय शिंदे याच्या दिशेने झाडली. त्यात आरोपी अक्षय शिंदे जखमी होऊन खाली पडला आणि त्याच्या हातातील पिस्तुलचा ताबा सुटला, त्यानंतर आम्ही आरोपी अक्षय शिंदे याच्यावर नियंत्रण मिळवले आणि वाहन जवळच्या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पीटल, कळवा येथे आणून मी अक्षय शिंदे व निलेश मोरे औषधोपचारसाठी दाखल झाले. त्यानंतर निलेश मोरे व मला पुढील औषधोपचारसाठी ज्युपीटर हॉस्पीटलला येथे दाखल केले असून वैद्यकीय उपचार चालू आहेत. आरोपी अक्षय शिंदे हा दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे मला नंतर समजले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+