Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

उद्धव ठाकरेंकडून विधानसभा लढवलेले एनकाऊंटर फेम प्रदीप शर्मांची पत्नी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत!

मुंबई : एन्काऊंटर स्पेशलिस्ट वादग्रस्त पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांची पत्नी स्वीकृती शर्मा यांनी राजकारणात प्रवेश केला आहे.

तत्पुर्वी मुंबईतील मलबार हिल परिसरात स्वीकृती शर्मा यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. स्वीकृती शर्मा या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार हे ठरलेले होते.

Encounter specialist Pradeep Sharma s wife Swikriti Sharma Sharma Eknath Shinde will join Shiv Sena

एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी प्रवेश सोहळा

माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती प्रदीप शर्मा यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह शर्मा यांच्या मुली अंकिता शर्मा आणि निकिता शर्मा यांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी हा पक्षप्रवेश संपन्न झाला.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोना काळात पीएस फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेल्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले. तसेच अंधेरीमधील काही प्रश्न असतील तर ते सरकारच्या माध्यमातून नक्की सोडवण्यात येतील असेही सांगितले.

पती प्रदीप शर्मांनी लढवली होती निवडणूक

मुंबई पोलिस दलातील वादग्रस्त माजी पोलिस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशलिस्ट यांनी 2019 साली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून नालासोपारा विधानसभा मतदारसघांची निवडणूक लढवली होती. हितेंद्र ठाकूर यांच्याविरोधात प्रदीप शर्मा यांनी निवडणूक लढवली. यामध्ये प्रदीप शर्मा यांचा पराभव झाला होता.

पत्नीची राजकारणात एंट्री!

प्रदीप शर्मा यांच्यानंतर आता त्यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांनी यामुळेच जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. आज त्यांच्या ताफ्यात 75 गाड्या आणि शेकडो दुचाकी होत्या. त्यांचे पती प्रदीप शर्मा यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवली तर खुद्द स्वीकृती शर्मा या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

लढवू शकतात विधानसभा निवडणूक

स्वीकृती शर्मा यांचा राजकारणात प्रवेश झाला, त्यामुळे त्या निवडणूक लढवणार असल्याची शक्यता आहे. स्वीकृती शर्मा या अंधेरी पुर्व येथून निवडणूक लढवू शकतात असे आडाखे बांधले जात आहेत. विशेषतः प्रदीप शर्मा यांचे मुख्यमंत्र्‍यांशी जवळचे संबंध असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्यांच्या पत्नीचे तिकीट हे निश्चित असल्याचे मानले जात आहे. मागच्याच महिन्यात खासदार रवींद्र वायकर यांची प्रदीप शर्मा यांनी सदिच्छा भेट घेत त्यांचा सत्कारही केला होता.

प्रदीप शर्मा कोण?

प्रदीप शर्मा हे मुंबई पोलिस दलात होते. एनकाऊंटर स्पेशालिस्ट म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यावरुनच त्यांच्यावर फेक एनकाऊंटर प्रकरणी चौकशीही सुरु होती. त्यांच्यावर यासंबंधीत कारवाईही झाली होती.

दरम्यान, तीन वर्षांची शिक्षाही त्यांना सुनावण्यात आली होती. या प्रकरणात त्यांना 2013 मध्ये त्यांना कोर्टाकडून सुटका करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा पुन्हा मुंबई पोलिस दलात 2017 ला ते रुजू झाले होते.

2006 च्या लखन भैया एन्काउंटर प्रकरणाशी संबंधित अनेक याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाने हा मोठा निर्णय दिला होता. मात्र आता सुप्रीम कोर्टाने प्रदीप शर्मा यांना दिलासा देत त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. महाविकास आघाडी सरकार असताना ॲंटिलिया प्रकरण चांगलंच गाजलं. या प्रकरणात प्रदीप शर्मांवरही आरोप झाले आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+