'गेट वे ऑफ इंडिया' गेटजवळ प्रवाशी बोट उलटली, NDRFच्या पथकाकडून बचावकार्य, थरारक VIDEO
Elephanta Passenger ship : मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया गेटजवळ प्रवाशी बोट उलटली आहे. यात अनेक प्रवाशी होते. ही बोट एलिफंटाला निघाली होती. दरम्यान, ही गेट गेट वे ऑफ इंडिया गेटपासून काही अंतरावर उलटली असून त्यात मोठ्या प्रमाणात प्रवाशी असल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेचा व्हिडिओ एका व्यक्तीने शूट केला असून तो व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. तर अन्य बोटच्या माध्यमातून या ठिकाणी मदत केली जात असल्याचे दिसून येत आहे. काही माध्यमांच्या नुसार, सदर बोटमधील प्रवाशांना वाचविण्यासाठी घटनास्थळावर एनडीआरएफचे जवान दाखल झाले आहेत. तर बोटमधील प्रवाशांना बाहेर काढले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेट वे ऑफ इंडियापासून निघालेल्या गेट वे ऑफ इंडियाजवळून दोन बोटी एलिफंटाच्या दिशाने निघाल्या होत्या. या दोन बोटींमध्ये धडक झाल्याची घटना बुधवारी दुपारी तीन ते चार वाजेच्या सुमारास घडली.
त्यानंतर ही बोट उलटली. सुदैवाने या घटनेत कोणताही जीवित हानी झालेली नसल्याचे समजते. या दोन्ही प्रवासी बोटी होत्या. त्यामधून अनेक प्रवासी प्रवास करत होते. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
गेट वे ऑफ इंडिया गेटपासून काही अंतरावर समुद्रात एक प्रवाशी बोट उलटली, पाहा या घटनेचा थरारक व्हिडिओ...! pic.twitter.com/O22Tdqwxim
— Pratap Awachar - प्रताप अवचार (@pratapbhagawata) December 18, 2024
एनडीआरएफचे पथक दाखल
एलिफंटाला जाणाऱ्या बोटमध्ये सुमारे तीस प्रवाशी असल्याची माहिती मिळत आहे. बोट बुडाल्यानंतर तत्काळ घटनास्थळी एनडीआरएफचे जवान दाखल झाले आहेत. बोटमधील प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम केले जात आहे.
किनाऱ्यापासून 50 मीटर दूर बोट उलटली
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी ही घटना घडली. त्यावेळी हवामान निरभ्र असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक गेट वे ऑफ इंडियावर पोहोचले होते. यातील अनेक लोक बोटिंगसाठी समुद्रातही गेले होते. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, काही पर्यटक बोटीने एलिफंटाच्या दिशेने जात होते. त्यांची बोट किनाऱ्यापासून सुमारे 50 मीटर समुद्रात गेल्यावर अचानक काहीतरी झाले आणि ती बुडू लागली. योगायोगाने एक मोठी बोट तिथे पोहोचली आणि बुडणाऱ्या बोटीतील काही प्रवाशांना मोठ्या बोटीवर नेण्यात आले.
मुंबईतील गेट वे ऑफ इंडियापासून काही अंतरावर बोट बुडाली. ही बोट एलिफंटाकडे जात होती. तेव्हा यात प्रवाशी बसलेले होते. प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी असे बचावकार्य करण्यात आले. pic.twitter.com/52Jz5lthj3
— Pratap Awachar - प्रताप अवचार (@pratapbhagawata) December 18, 2024
अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट
बोट उलटण्याचे कारण समजू शकले नाही. काहींना तात्काळ वाचवण्यात आले आहे. रेस्क्यू केलेल्या प्रवाशांना गेट वे ऑफ इंडियाजवळ आणले जात आहे. या घटनेत जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आली नाही. जवळपास सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications