महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होणार, निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद
Maharashtra Assembly Election: s केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद होणार असून आयोग महाराष्ट्रासह चार राज्यांत होणा-या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जारी केले जाणार आहे. महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोग आज दुपारी हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करेल असे पीटीआयने वृत्त दिले आहे.

महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ कधीपर्यंत?
महाराष्ट्रातील विधानसभेची कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ 3 नोव्हेंबरपर्यंत आहे. तसेच झारखंड विधानसभेचा कार्यकाळ 4 जानेवारी 2025 पर्यंत आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने निर्धारित केल्याप्रमाणे 30 संप्टेबरपूर्वी जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका घेण्याची आयोगाची योजना आहे.
चार राज्यातील विधानसभेच्या जागा
महाराष्ट्र विधानसभा 288 जागा
झारखंड विधानसभा- 81 जागा
हरियाणा विधानसभा-90 जागा
जम्मू काश्मीर विधानसभा- 90 जागा (जम्मू 43 तर काश्मीर 47 जागा)
महाविकास आघाडी प्रचाराचा नारळ फोडणार
विधानसभा निवडणुकांची घोषणा आज होणार आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीनेही निवडणुकेची जोरदार मोर्चेबांधणी केली आहे महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा आज (16 ऑगस्ट) मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडत आहे. याच मेळाव्यात प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर विधानसभा निवडणुकीतदेखील नेत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. विधानसभेतही मविआला चांगले यश मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मविआ आणि महायुती एकसंध राहणार नाही - शेट्टी
मविआ आणि महायुतीकडून विधानसभेची जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे मात्र अशातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार"महाविकास आघाडी आणि महायुती शेवटपर्यंत एकसंध राहतील असं वाटतं नाही", असं वक्तव्य केले आहे. तसेच अनेक घडामोडी घडणार असल्याचेही राजू शेट्टी यांनी म्हटले आहे, त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.












Click it and Unblock the Notifications