मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाहनाचे सारथ्य देवेंद्र फडणवीसांकडे! अजित दादा अनुपस्थित, चर्चांना ऊत!
Eknath Shindes vehicle driven by Devendra Fadnavis : मुंबई कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सीलिंकला जोडून संपूर्ण पुलाचा लोकार्पण सोहळा काल पार पडला. या पुलाचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. विशेष म्हणजे पुल पाहणीवेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच गाडीतून प्रवास केला.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या वाहनाचं देवेंद्र फडणवीस यांनी सारथ्य केलं. याचं अनेकांनी कौतुकही केलं पण पण अजित पवार कुठे होते हा प्रश्न आता चर्चिला जात आहे.

अजित पवार अनुपस्थित
कोस्टल रोडची पाहणी करतानादेवेंद्र फडवीस गाडी चालत होते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेजारी बसले होते, मात्र या गाडीत उपमुख्यमंत्री अजित पवार नव्हते. अजित पवार हे का आले नाही, ते का अनुपस्थित होते अशा प्रश्नांची चर्चा होत आहे.
महायुतीत बेबनाव तर नाही...
एकीकडे ट्रिपल इंजिन सरकार चालवत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वारंवार सांगत आहेत तर दुसरीकडं अजित पवार हे मात्र जनसन्मान यात्रेपासून आपला अजेंडा वेगळा चालवत असल्याचं दिसून येत आहे. त्यांचं शरद पवारांच्या पक्षाला सोडण्यासंदर्भात वक्तव्य असो की, अमित शहा काही दिवसांपुर्वी मुंबई दौऱ्यावर आले होते.
या दौऱ्यातही अजित पवार अमित शहांसोबत दिसले नाहीत, त्यांची अनुपस्थितीवरुनही प्रश्न आणि चर्चा समोर आल्या. ही अधुरी भेट असो किंवा लाडकी बहिण योजनेचा श्रेयवादाचा प्रश्न आणि बॅनरबाजी यावरुन अजित पवार हे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. तसंच महायुतीत बेबनाव तर नाही ना अशी शक्यताही आता वर्तवली जात आहे.
कुठे होते अजित पवार..?
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे काल पुणे दौऱ्यावर होते. पुण्यातील चाकण इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा झाला. या मेळाव्यासाठी ते उपस्थित होते. याशिवाय कालच पुणे जिल्ह्यातील आळंदी, खेड आणि चाकण इथं ५३६ कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पाचं भुमिपूजन आणि उद्घाटन होतं. त्यामुळे अजित पवार हे या कार्यक्रमासाठी आले होते. असं असलं तरीही राज्यातील महत्वाचे दोन्ही कार्यक्रम एकाच दिवशी मुहुर्त का ठरला कशामुळे ठरवला गेला हे प्रश्न तूर्त तरी कायम आहेत.












Click it and Unblock the Notifications