मशाल विरुद्ध धनुष्यबाण! कुणाचा स्ट्राईकरेट जास्त? CM एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
Eknath Shinde's Shiv Sena vs Uddhav Thackeray's UBT : लोकसभा निवडणुकीत मशाल विरुद्ध धनुष्यबाण यांच्यात फाईट झाली. तेरा जागांवर समोरासमोर लढत झाली. त्यातील सात जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तर सहा जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांशी बोलताना 40 टक्के स्ट्राईकरेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा तर 47 टक्के स्ट्राईक रेट आमचा होता असे सांगून आम्हीच लोकसभेच्या निवडणुकीत वरचढ होतो हे स्पष्ट केले.

दूध का दूध पाणी का पाणी होईल
एकनाथ शिंदे म्हणाले, या निवडणुकीत दूध का दूध पाणी का पाणी होईल, महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प त्यामध्ये स्टे, स्प्रिड ब्रेकर घातलेले प्रकल्प आम्ही पुढे नेत आहोत. त्यात सुरु केलेले प्रकल्प, एकीकडे विकास प्रकल्प आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना आम्ही महाराष्ट्रात आणल्या. विकास आणि त्यांची सांगड घालण्याचे आम्ही काम केले.
जनतेची सेवा करायला पुन्हा तत्पर
एकनाथ शिंदे म्हणाले, जनता जनार्धन आम्ही केलेल्या कामाची पोचपावती या विधानसभा निवडणुकीत आम्हाला देणार आहे हे नक्की. महायुतीचे बहुमताचं सरकार या महाराष्ट्रात पुन्हा येईल आणि जनतेची सेवा करायला पुन्हा तत्पर राहील.
महायुतीत कुठेही वाद नाही
एकनाथ शिंदे म्हणाले, आता सर्वच बाबतीत सांगायचे झाल्यास लवकरच आमची पुन्हा एक यादी येईल. महायुतीत कुठेही वाद नाही, समन्वयाने सर्व गोष्टी होतात. महायुतीच्या बाजूने चांगले वातावरण महाराष्ट्रात होत आहे.
लोकसभेत मशालविरुद्ध धनुष्यबाण जिंकला
एकनाथ शिंदे म्हणाले, मशाल विरुद्ध धनुष्यबाण यांच्यात फाईट झाली. तेरा जागांवर समोरासमोर आम्ही फाईट केली. त्यातील सात जागा आम्हाला मिळाल्या आहेत. 40 टक्के स्ट्राईकरेट त्यांचा तर 47 टक्के स्ट्राईक रेट आमचा आहे. आम्ही ही फाईट जिंकलो आहोत. दोन लाख साठ हजार मतं आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त घेतली आहेत. लोकसभेत फेकाफेकी करुन, फेक नरेटीव्ह करुनही धनुष्यबाण त्यांच्यावर भारी पडलेला आहे.
उबाठापेक्षा आमचा स्ट्राईकरेट जास्त
एकनाथ शिंदे म्हणाले, या विधानसभेला स्ट्राईकरेट उबाठा पेक्षा जास्त होता. महायुतीचा स्ट्राईक रेट कामाच्या जोरावर विविध योजनांच्या जोरावर सर्वात भारी असेल. सर्वांना चारीमुंड्या चित करेल.
लाडकी बहिण योजनेत त्यांनी खोडा घातला
एकनाथ शिंदे म्हणाले, या निवडणुकीत आमचे लोक चौकार षटकार ठोकणार आहेत. लाडकी बहिण योजना आम्ही सुरु केली तेव्हा त्यांनी खोडा घातला. ते कोर्टात गेले त्यांना कोर्टाने चपराक लावली नंतर ते नागपूरच्या कोर्टात गेले. लाडकी बहिण योजना त्यांच्या पोटात सलत असून त्यांच्या डोळ्यात खुपत आहेत.
लाडकी बहिण योजना सुरुच राहणार
एकनाथ शिंदे म्हणाले, ज्या योजना आणल्या त्याची आम्ही चौकशी करु आणि बंद पाडू. लाडक्या बहिणींनी ठरवलेले आहे की, आम्हा लाडक्या भावांना पुन्हा सरकारमध्ये आणायचे आहे. ही योजना कुणी माई का लाल आला तरी बंद होणार नाही. त्याचे पैसेही वाढत जाईल. ज्या योजना सुरु केल्या त्यातील एकही योजना बंद पाडणार नाही जे योजना बंद पाडण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना घरी पाठवू.
लोकसभेला त्यांनी जंग जंग पछाडलं
एकनाथ शिंदे म्हणाले, त्यांची रणनिती लोकसभेला कळली. ठाणे लोकसभा जिंकण्यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले पण त्यांची पळता भुई थोडी झाली. कोकणात एकही जागा मिळाली नाही. बाळासाहेबांचे आणि कोकणाचे नाते होते पण त्यांनी बाळासाहेबांची बेईमानी केली म्हणून कोकणात त्यांचा एकही खासदार आला नाही आता एकही आमदार निवडून येणार नाही.












Click it and Unblock the Notifications