Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

उपमुख्यमंत्री होतो, पण... एकनाथ शिंदे यांची भाजपला नवीन अट?

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दीपक केसरकर यांनी दोन तारखेनंतर मुख्यमंत्र्‍यांचा शपथविधी होईल, असे सांगितलेय. तर महायुतीतील इतर नेत्यांच्या कयासानुसार पाच डिसेंबरला नव्या मंत्रीमंडळाचा शपथविधी होईल. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याबाबत अजूनही महायुतीने कोणतेच नाव जाहीर केलेले नाही. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री होण्यासाठी भाजपकडूनच दबाव येत असला तरी, एकनाथ शिंदे यांनीही या पदासाठी एक नवीन अट घातली आहे, अशाही चर्चा आता रंगल्या आहेत.

Eknath Shinde

कधी होईल शपथविधी?

महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. तरीही भाजपने त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केलेली नाही. दोन डिसेंबरपर्यंत शपथविधीसाठी चांगला मुहूर्त नसल्याचे महायुतीच्या गोटातून सांगण्यात आले. दुसरीकडे येत्या 5 डिसेंबर रोजी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल, असेही सांगितले जाते. भाजप आपल्या नव्या सरकारचा शपथविधी हा मुहूर्तावरच करणार असल्याचे, आता स्पष्ट झाले आहे. मात्र हा मुहूर्त डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच असेल, एवढे मात्र नक्की झाले आहे.

शिवसेनेला मिळतील १२ मंत्रीपदे

आजची महायुतीची नियोजित बैठक अचानक रद्द झाली. त्यानंतर एकनाथ शिंदे हे त्यांच्या साताऱ्यातील दरे या मूळ गावी रवाना झाले. पुढील दोन दिवस महायुतीची कोणतीही बैठका होणार नाही, असेही सांगण्यात आले. शिवसेना शिंदे गटाला बारा ते तेरा मंत्रिपदे मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर अजित पवार गटाला नऊ ते अकरा मंत्रीपदे दिली जातील, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

एकनाथ शिंदे यांची नवी अट?

मुख्यमंत्री जरी भाजपचा झाला, तरी उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हेच रहावेत, असा भाजपच्या नेत्यांचा आग्रह असल्याचे समजते. मात्र एकनाथ शिंदे यांनी जर गृहमंत्रीपद शिवसेनेला दिले तरच उपमुख्यमंत्री म्हणून राहण्याची अट घातली आहे, अशीही माहिती आता समोर येत आहे. दुसरीकडे भाजप गृहखात्यासाठी अग्रही आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना गृहखातं मिळणार का? हा प्रश्न आहे. ते मिळालं नाही तर उपमुख्यमंत्रिपद शिवसेनेच्या दुसऱ्या नेत्याला दिले जाण्याची चर्चाही आता होऊ लागली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+