चेहरा भोळा भानगडी सोळानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात 'फोकट बाबुराव!' एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं!
Eknath Shinde's blunt criticism of Uddhav Thackeray : राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीत गरमागरम संघर्ष झाल्यानंतर आता कोल्डवाॅर सुरु आहे. एकनाथ शिंदे हे त्यांचे विरोधक आणि शिवसेना (युबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर एकामागून एक हल्ले करत आहेत, त्यांनी कोल्हापुरात
"दिसायला भोळा भानगडी सोळा..!" असे म्हणत उद्धव ठाकरेंना आव्हान दिले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा 'फोकट बाबूराव'म्हणत उद्धव ठाकरेंना हिनवले आहे.
गुरुवारी अर्थात 10 एप्रिल 2025 रोजी उद्धव ठाकरे यांच्यावर प्रखर पण तितकीच बोचरी टीका केली. एकनाथ शिंदेंवर उद्धव ठाकरे असो की, आदित्य ठाकरे अथवा शिवसेनेचे (युबीटी) बहुतांश नेते यांनी कठोर आणि वैयक्तिक पातळीवर टीका केली होती. आता उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिक टीका केली आहे. सलग सात दिवसांतील ही दुसरी बोचरी टीका आहे.

मी फेवरेट भाऊ आणि ते...टाईमपास!
एकनाथ शिंदे यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातील जाहीर सभेत बोलताना "ठाकरेंच्या फेसबुकला 'टाईमपास' असे संबोधले आणि उद्धव ठाकरेंच्या फेसबुकचा अर्थ 'फोकट बाबुराव' असा होतो, तर मी 'आवडता भाऊ'" आहे असे म्हटले आहे.
उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता एकनाथ शिंदे यांनी थेट हल्ला चढवला. एकनाथ शिंदे म्हणाले, त्यांनी त्यांच्या 'निर्दोष वर्तनाने'(उपहासात्मक) वर्षानुवर्षे लोकांची दिशाभूल केली. तसेच त्यांना 'फोकट बाबुराव' म्हटले.
एफबी म्हणजे वेळ घालवणे- 'फोकट बाबूराव'
एकनाथ शिंदे म्हणाले, "काही लोक त्यांच्या बंगल्यात बसून एफबी म्हणजेच फेसबुक खेळत राहतात. यात कोणाचेही काहीही होत नाही, ते फक्त बसून वेळ घालवतात. एफबी म्हणजे काय? 'फोकट बाबुराव'... मीही एफबी आहे, म्हणजेच फेवरेट ब्रदर.महाराष्ट्राचा 'आवडता भाऊ', हा फरक आहे, फरक पहा." असे ते म्हणाले.
दिसायला भोळा भानगडी सोळा..!
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरात शिवसेनेच्या आभार यात्रेत विरोधकांना आपल्या स्टाईलने लक्ष्य केले होते. त्यात खासकरुन उद्धव ठाकरेंचे नाव न घेता त्यांनी दिसायला भोळा आणि भानगडी सोळा असे म्हणत ठाकरेंना टोला लगावला होता.
उद्धव ठाकरेंवर वारंवार हल्ला
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. त्यांनी सतत ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. लाडकी बहिण योजनेला विरोधकांनी विरोध केला होता असे म्हणत त्यात ठाकरेंवरही शरसंधान एकनाथ शिंदेंनी साधले.
विरोधकांना दाखवला कोल्हापूरी जोडा
लाडकी बहीणसारख्या योजनांमध्ये विरोधकांनी खोडा घातल्याचा आरोपही केला. ते म्हणाले, "विधानसभा निवडणुकीवेळी ज्यांनी या योजनेमध्ये खोडा घातला होता, त्यांना तुम्ही चांगला कोल्हापूरी जोडा दाखवला. महायुतीचे सरकार आले. आजही आमची टीम तिच आहे. देवेंद्रजी, मी आणि अजित दादा."












Click it and Unblock the Notifications