बालाजी कल्याणकर : नांदेड उत्तर मधील जायंट किलर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मराठवाड्यातील विश्वासू
Balaji Kalyankar : शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीमुळे आणि संघटनेने तळागाळात केलेल्या कामामुळे अनेक सामान्य तरुण मोठ्या मोठ्या पदांचे मानकरी झाले. ही नामावली खूप मोठी आहे. या साध्या साध्या शिवसैनिकांनी बड्या बड्या नेत्यांचा दारुण पराभव केला. महाराष्ट्राच्या राजकारणात अशा शिवसैनिकांना जायंट किलर म्हणून ओळखले जाते. या नामावलीत अलीकडेच समाविष्ट झालेले नाव म्हणजे नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर.
बालाजी कल्याणकर साधे शिवसैनिक. तळागाळात काम करत करत त्यांनी आपला लोकसंपर्क वाढवला. नांदेड शहर आणि परिसरात त्यांच्या नावाचा दबदबा हळूहळू निर्माण झाला. अडीअडचणीला धावून जाणारा शिवसैनिक अशी त्यांची ख्याती होती. आणि त्यातूनच 2017 साली झालेल्या नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीत बालाजी कल्याणकर नगरसेवक म्हणून विजयी झाले. पुढच्या दोन वर्षात त्यांनी आपल्या कामाचा झपाटा आणखी वाढवला आणि 2019 साली त्यांना नांदेड उत्तर मतदारसंघातून विधानसभेचे तिकीट देण्यात आले. नांदेड शहर आणि परिसरावर अशोक चव्हाण यांचा वरचष्मा आहे. नांदेड उत्तर मतदारसंघात अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय डी पी सावंत अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. 2019 च्या निवडणुकीत त्यांना पराभूत करून बालाजी कल्याणकर यांनी इतिहास घडवला आणि एक साधा नगरसेवक आमदार झाला.

एकनाथ शिंदे यांना साथ
2019 साली महायुती मोडून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी संधान साधले. उद्धव ठाकरे यांनी स्वतः मुख्यमंत्रीपद घेऊन आदित्य ठाकरे त्यांना कॅबिनेट मंत्री केले. महाविकास आघाडीत रममाण झालेले उद्धव ठाकरे शरद पवार वगैरे नेत्यांच्या इतके आहारी गेले की त्यांचे स्वतःचा पक्षातून निवडून आलेल्या आमदारांकडे सपशेल दुर्लक्ष झाले. अशा दुर्लक्षित आमदारांपैकी एक होते ते बालाजी कल्याणकर. एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीपासूनच बालाजी कल्याणकर यांना पाठबळ दिले. वेळोवेळी त्यांना मदत केली, आवश्यक ती ताकद दिली. आणि एकनाथ शिंदे व बालाजी कल्याणकर हे घट्ट समीकरण झाले. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात एकनाथ शिंदे आणि भूमिका घेतल्यानंतर कल्याणकर यांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले. मुख्यमंत्री झाल्यानंतरही एकनाथ शिंदे यांनी कल्याणकर यांना अंतर दिले नाही.
जिल्हा रुग्णालय उभारणीसाठी प्रयत्न
नांदेड जिल्ह्यातील पावडेवाडी जिल्हा परिषद मतदार संघात जिल्हा रुग्णालय उभारणीसाठी कल्याणकर यांनी अथक प्रयत्न केले. हे सुपर स्पेशलिटी रुग्णालय अत्याधुनिक आरोग्य सुविधा पुरविणार असून त्याचा नांदेड आणि लगतच्या जिल्ह्यातील नागरिकांना मोठा लाभ होणार आहे. नांदेड उत्तर मतदारसंघात कृषी महाविद्यालयाच्या उभारणीसाठी देखील कल्याणकर यांनी पाठपुरावा केला. या महाविद्यालयासाठी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यातील तरुणांना या माध्यमातून उच्च शिक्षणाची संधीच कल्याणकर उपलब्ध करून देत आहेत. यातून रोजगाराच्या संधीही निर्माण होणार आहेत.
महत्वाच्या रस्त्याचा चेहरामोहरा बदलणार
नांदेड मधील छत्रपती चौक ते लिंबगाव या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून प्रचंड दुरावस्था झाली आहे. याबद्दल नांदेड उत्तरेच्या नागरिकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत होती. रोज साधारणपणे 50000 नागरिक या रस्त्यावरून प्रवास करतात. या रस्त्यात चेहरा मोहरा बदलून टाकण्यासाठी बालाजी कल्याणकर यांनी प्रयत्न केले आहेत. आणि या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले असून ते लवकरच पूर्णत्वास जाण्याची चिन्हे आहेत.
हनुमान मंदिराचा पुनर्विकास
हनुमान गड प्रभागातील हनुमान मंदिर हे शहरातील हिंदू धर्मियांसाठी एक महत्त्वाचे श्रद्धेचे ठिकाण आहे. या स्थळाचे धार्मिक महत्त्व ओळखून आमदार कल्याणकर यांनी हनुमान मंदिराच्या पुनर्विकासासाठी प्रयत्न केले आणि या पुनर्विकासासाठी तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हनुमान गड हे भाविकांसाठी एक महत्त्वपूर्ण ठिकाण करणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्मारकासाठी निधी
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी आदर्श राज्यकारभाराचा नमुना घालून दिला. देशभरात आजही अहिल्याबाई होळकर यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक नांदेडमध्ये उभारले जावे अशी स्थानिकांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्या मागणीच्या गांभीर्याने विचार करून आमदार बालाजी कल्याणकर यांनी सरकार दरबारी पाठपुरावा केला आणि राणी अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकासाठी तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला आहे. यामुळे एका मोठ्या समाज घटकाची अनेक वर्षापासूनची मागणी पूर्ण होत आहे.
नांदेड उत्तरमधून पुन्हा संधी
"माझ्यासोबत आलेल्या कोणत्याही आमदाराचे नुकसान होणार नाही आणि कोणताही आमदार पराभूत होणार नाही" असा शब्द एकनाथ शिंदे यांनी विश्वास दर्शक प्रस्तावाला उत्तर देताना सभागृहात दिला होता. शिंदे यांच्यासोबत आलेल्या जवळपास सर्व आमदारांना आणि खासदारांना संधी देण्यात आली. ज्या खासदारांची तिकिटे कापण्यात आली किंवा जे खासदार पराभूत झाले त्यांना विधान परिषदेवर सामावून घेण्यात आले तसेच काही जणांना विधानसभा निवडणुकीत देखील संधी देण्यात आली. बालाजी कल्याणकर यांनाही नांदेड उत्तर मतदार संघातून संधी देण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजप प्रवेश केला असून ते राज्यसभा खासदार झाले आहेत आणि त्यांच्या कन्येला भाजपने भोकर या पारंपरिक मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. नांदेड शहरात अशोक चव्हाण यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे बालाजी कल्याणकर यांना आमदारकीची दुसरी टर्म निश्चित मिळेल असे वातावरण मतदार संघात आहे.
-
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
Epfo pension : 20 दिवस उलटूनही पेन्शन क्लेम होतोय रिजेक्ट? ही आहेत कारणे; वाचा ईपीएफओचा नवा नियम -
LPG Cylinder New Rule: गॅस सिलिंडर बुकिंगमध्ये बदल; ग्रामीण भागात आता 'इतक्या' दिवसांनी होणार बुकिंग -
Gold Price Forecast: सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ! 1 तोळा सोनं 2 लाखांचा टप्पा ओलांडणार? वाचा अंदाज -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
LPG gas connection ekyc : एलपीजी ग्राहकांनो! ई-केवायसी करा, अन्यथा गॅस मिळणे बंद; जाणून घ्या प्रोसेस -
मनोरंजन विश्वावर शोककळा! अवघ्या 27व्या वर्षी प्रसिद्ध कलाकाराचा संशयास्पद मृत्यू -
PM Kisan 22nd Installment आज कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2 हजार रुपये; वेळ आणि स्टेटस तपासा -
Horoscope Today March 12, 2026 Marathi : गुरुवार ठरणार प्रगतीचा दिवस; वाचा तुमच्या राशीत काय आहे खास -
IPL 2026 Schedule: आयपीएलचे 15 दिवसांचे वेळापत्रक समजून घ्या; पहिल्या सामना RCB Vs हैदराबाद









Click it and Unblock the Notifications