Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

दिसायला भोळा, भानगडी १६, खटक्यावर बोट जाग्यावर पलटी, एकनाथ शिंदेंचा मूड बदलला, कोण होतं रडारवर? वाचा

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी कोल्हापूरात होते. कोल्हापूर येथे शिवसेनेच्या आभार यात्रेत त्यांनी विरोधकांना आपल्या स्टाईलने लक्ष्य करत, आगामी निवडणुकांमध्ये कामाला लागण्याचे संकेत कार्यकर्त्यांना दिले. कोल्हापूरातील सरवडे येथे आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांचा मूड काहीसा वेगळा दिसला. आपल्या स्टाईलने त्यांनी विरोधकांना धो-धो धूतलं.

Eknath Shinde s speech in Kolhapur

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

या कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की,"बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता घरात नाही, तर लोकांच्या दारात शोभून दिसतो. एकनाथ शिंदेने या अडीच वर्षांच्या काळात हेच काम केले. मी लोकांमध्ये रमणारा आहे. गेल्या अडीच वर्षात केलेल्या कामची पावती जनतेने दिली. या विधानसभा निवडणुकीत जनतेने ऐतिहासिक विजय मिळवून दिला. लोकसभेमध्ये फेक नॅरेटीव्ह पसरवले. संविधान धोक्यात आहे, आरक्षण जाणार अशा खोट्या गोष्टी पसरवल्यामुळे आमचे संजय मंडलिक त्यात अडकले. विरोधकांना वाटले विधानसभा निवडणुकीतही असेच करू. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना जेलमध्ये टाकू. त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवून मारू. एवढी हवा त्यांच्या डोक्यात गेली होती," असा आरोपही उपमुख्यमंत्र्यांनी केला.

इथं खटक्यावर बोट, जाग्यावर पलटी

एकनाथ शिंदे म्हणाले की, "लाडक्या बहिणींनो, लाडक्या भावांनो, लाडक्या शेतकऱ्यांनो तुमचे आभार मानतो. व्यासपीठ आमचं मजबूत आहे आणि समोर बसलेलं आमचं वैभव आहे. निवडणुकीत मी वचन दिलं होतं. म्हणून आभार मानायला आलो. अडीच वर्षात तुमचा एकनाथ शिंदे 22 तास काम करत पायाला भिंगरी बांधून फिरला. काम केलं निर्विवाद म्हणून जनतेनं दिलं भरभरून आशीर्वाद. आमचं ठरलं म्हणत कोल्हापूरच्या जनतेनं 10 पैकी 10 आमदार दिले. इथं खटक्यावर बोट, जाग्यावर पलटी केलं, टांगा पलटी घोडे फरार. तुम्ही प्रकाशला आमदार केलं, मी त्यांना नामदार केलं, पालकमंत्री केलं. कोल्हापूरकरांचा नाद करायचा नाही, जाळ आणि धूर संघटच निघतो."

कोल्हापूरी जोडा दाखवला...

पुढे बोलताना एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीणसारख्या योजनांमध्ये विरोधकांनी खोडा घातल्याचा आरोपही केला. ते म्हणाले, "विधानसभा निवडणुकीवेळी ज्यांनी या योजनेमध्ये खोडा घातला होता, त्यांना तुम्ही चांगला कोल्हापूरी जोडा दाखवला. महायुतीचे सरकार आले. आजही आमची टीम तिच आहे. देवेंद्रजी, मी आणि अजित दादा."

आगामी निवडणुकांचे संकेत

या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. स्थानिक स्वराज्य संस्था हा सत्तेचा पाया आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी या संस्थांतील निवडणुकांना महत्व देत त्या जिंकण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी आपल्या स्टाईलने भाषण करत, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+