शिंदेंच्या सेनेची तिसरी यादी जाहीर; माजी मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्येला उमेदवारी, वाचा यादी

Eknath Shinde ShivSena Third Candidate List : शिवसेना शिंदे गटाकडून 13 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. तर दोन जागा महायुतीमधील मित्रपक्षांना देण्यात आल्या आहेत. यात रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांना कन्नड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर दोन जागा मित्र पक्षांना सोडण्यात आल्या आहेत.

यापैकी हातकणंगलेची जागा जनसुराज्य पक्षाला, तर शिरोळची जागा शाहुविकास आघाडीला सोडण्यात आली आहे. दरम्यान, कालच शिवसेनेने 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली होती. तर यापूर्वी 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झालेली होती. अशाप्रकारे आता पर्यंत शिवसेना शिंदे गटाकडून 78 उमेदवार मैदानात उतरवले तर दोन ठिकाणी महायुतीली मित्रपक्षांना पाठिंबा दिल्याने शिंदेसनेच्या वाट्याला 80 जागा आल्याचे स्पष्ट झाले आहे.

eknath shinde  shivsena

शिंदेसेनेची तिसरी यादी, वाचा कुणाला कुठून संधी

  • सिंदखेड राजा - शशिकांत खेडेकर
  • घनसावंगी- हिकमत उढाण
  • कन्नड- संजना जाधव
  • कल्याण ग्रामीण- राजेश मोरे
  • भांडूप पश्चिम- अशोक पाटील
  • मुंबादेवी- शायना एनसी
  • संगमनेर- अमोल खताळ
  • श्रीरामपूर - मल्हारी कांबळे
  • नेवासा- विठ्ठल लंघे पाटील
  • धाराशिव- अजित पिंगळे
  • करमाळा- दिग्विजय बागल
  • बार्शी- राजेंद्र राऊत
  • गुहागर- राजेश बेंडल

पाठिंबा- जनसुराज्य

  • हातकणंगले- अशोकराव माने - राजश्री शाहू विकास आघाडी
  • शिरोळ- राजेंद्र यड्रावकर - शाहुविकास आघाडीलाशायना एनसी, रावसाहेब दानवेंच्या लेकीला उमेदवारी

भाजप नेत्या शायना एनसी यांना शिवसेनेकडून तिकीट

भाजप नेत्या शायना एनसी वरळी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक होत्या. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून वरळीत मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यानंतर शायना एनसी यांना शिवेसनेकडून मुंबादेवी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+