Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी एकनाथ शिंदेंची दमदार कामगिरी; क्रीडा संकुल स्थापनेला प्राधान्य

Eknath Shinde promoted construction sports complexes : आपल्या महाराष्ट्राला क्रीडा क्षेत्रातील नैपुण्याची मोठी परंपरा लाभली आहे. क्रिकेट, कुस्ती, नेमबाजी, हॉकी अशा विविध क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चमक दाखवली. महाराष्ट्राचे कुस्तीगीर खाशाबा जाधव यांनी 75 वर्षांपूर्वी ऑलिंपिक मध्ये कुस्ती या क्रीडा प्रकारात कांस्यपदक पटकावले होते. क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, विनोद कांबळी, संजय मांजरेकर अशा अनेक नामांकित खेळाडूंनी महाराष्ट्राचे नाव प्रसिद्ध केले. धनराज पिल्ले यांच्यासारख्या खेळाडूंनी हॉकीमध्ये चांगली चमक दाखवली. पण राज्याचे क्रीडा विषयक धोरण आणि राज्य सरकारचे खेळाडूंना सुविधा उपलब्ध करून देण्याकडे असलेले दुर्लक्ष महाराष्ट्रात विशेष चर्चेत राहिले. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र राज्यातील क्रीडापटूंच्या उत्कर्षाकडे आणि त्यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याकडे विशेष लक्ष दिले आहे.

विविध क्रीडा प्रकारात नावलौकिक मिळवणाऱ्या खेळाडूंसाठी खाजगी कंपन्या तसेच सरकारमध्येही नोकऱ्यांमध्ये काही जागा राखीव ठेवण्यात येतात. महाराष्ट्र सरकारने क्रीडा विभागात खेळाडूंसाठी 271 नवीन पदांची निर्मिती केली असून त्यापैकी 116 पदावर भरती करण्यात येत आहे.

Eknath Shinde

छत्रपती संभाजी नगर येथे होणार भव्य क्रीडा संकुल

छत्रपती संभाजी नगर शहरात भव्य क्रीडा संकुल उभारण्यासाठी आराखडा सादर करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना नुकतेच दिले आहेत. आमखास मैदानाच्या जागेत हे भव्य क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. यापूर्वी या जागेचा वापर समारंभ, सोहळे आणि सभा यांच्यासाठी करण्यात येत होता. येथे क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात आल्यानंतर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील खेळाडूंसाठी आणि तरुणांसाठी सुसज्ज आणि अद्ययावत असे संकुल उपलब्ध करून दिले जाणार आहे . मालेगाव (जि. नाशिक) तालुक्यातील काष्टी क्रीडा संकुलासाठी २५ कोटी रुपयांची तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. उत्तर मुंबईत भव्य क्रीडा संकुल उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्यात समझो त्याचा करार नुकताच करण्यात आला आहे.

राज्यभरात १२२ क्रीडा संकुले उभारण्याचा मानस

मुंबई येथे क्रीडा संकुल विकसित करण्यासाठी भारताचा प्रसिद्ध क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला भाडेतत्त्वावर मुंबईतील वांद्रे भागातील 2,000 चौरस मीटर जमीन हस्तांतरणास राज्याच्या एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे राज्यातील सात जिल्हा क्रीडा संकुल व 82 तालुका क्रीडा संकुल अशा 89 क्रीडा संकुलांच्या प्रस्तावास प्रशासकीय व तांत्रिक मान्यता मंजूर करण्यात आली आहे. राज्याला क्रीडा क्षेत्रात अव्वल स्थानी आणण्यासाठी ग्रामीण भागात 122 क्रीडा संकुले उभारण्याचा मनोदय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. पुणे जिल्हा क्रीडा संकुल अंतर्गत विविध कामे करण्यासाठी 15 कोटी 69 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ठाणे शहरातही तालुका क्रीडा संकुलासाठी भरीव निधी देण्यात आला असून त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. राज्याच्या विविध महसुली विभागांमध्ये क्रीडापटूंसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न केले आहेत.

नामांकित खेळाडूंचा गौरव

जागतिक पातळीवर क्रीडा प्रकारात नावलौकिक मिळवणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. एकनाथ शिंदे यांनी या गौरवाचे स्वरूप आणखी विस्तारित केले असून त्याला व्यापक स्वरूप दिले आहे. t20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने अजिंक्य पद पटकावले. भारताच्या 20 ट्वेंटी विश्वचषक संघात सहभागी असलेल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंना प्रत्येकी एक कोटी रुपये पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या सरकारने या खेळाडूंना विधिमंडळात पाचारण करून त्यांचा सत्कार घडवून आणला. याप्रसंगी सरकारमधील मान्यवरांची तसेच कप्तान रोहित शर्मा यांचे भाषण लक्षवेधी ठरले.

ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंचा सन्मान

नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिंपिक मध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा राधानगरी तालुक्यातील नेमबाज स्वप्निल कुसाळे याने पदक प्राप्त केले. त्यालाही एक कोटी रुपयांचे बक्षीस देऊन राज्य सरकारने गौरवान्वित केले आहे. आशिया चषक स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंच्या पारितोषिक रचनेत वाढ करण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतला आहे.

एकूणच राज्यात विविध पायाभूत सुविधांची निर्मिती करत असतानाच क्रीडा विषयाकडेही एकनाथ शिंदे सरकारने गांभीर्याने लक्ष दिले आहे. राज्याच्या ग्रामीण भागात सुविधा उपलब्ध करून देऊन चांगले खेळाडू घडवण्याचा सरकारचा मानस स्पष्टपणे दिसत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+