मोदींवर आरोप म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार; पृथ्वीराज चव्हाणांवर एकनाथ शिंदेंचा जळजळीत पलटवार!
Eknath Shinde Slams Prithviraj Chavan : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि 'एपस्टीन फाईल्स' संदर्भात काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चव्हाणांच्या या आरोपांचा खरपूस समाचार घेत, "पंतप्रधानांबद्दल वाट्टेल ते बोलून चर्चेत राहण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असून, हे विधान म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे," अशा कडक शब्दांत तोफ डागली.

चर्चेत राहण्यासाठी केविलवाणी धडपड
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमहापौर आबा ऊर्फ उल्हास बागुल यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात माध्यमांशी संवाद साधताना शिंदेंनी पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानांचा पंचनामा केला.
शिंदे म्हणाले की, "जेव्हा एखादा नेता राजकीयदृष्ट्या दुर्लक्षित होतो, तेव्हा पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी अशा सनसनाटी आणि बिनबुडाच्या बातम्या पसरवल्या जातात. चव्हाणांचे वक्तव्य हे त्यांच्या नैराश्यातून आलेले आहे."
भारताची प्रगती आणि विरोधकांची 'पोटदुखी'
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाने केलेल्या प्रगतीचा पाढा वाचताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "२०१४ पासून मोदींनी देशाला विकासाच्या ज्या उंचीवर नेऊन ठेवले आहे, ते जगाला माहीत आहे. आपली अर्थव्यवस्था आज जगात पाचव्या क्रमांकावर असून आपण तिसऱ्या क्रमांकाकडे वेगाने वाटचाल करत आहोत. ही प्रगती विरोधकांना सहन होत नाहीये. चव्हाणांच्या वक्तव्यातून त्यांची 'पोटदुखी' आणि जळजळ स्पष्टपणे दिसून येत आहे."
विधानांमधील विसंगतीवर ओढले ताशेरे
पृथ्वीराज चव्हाण यांच्या बदलत्या विधानांवरून शिंदेंनी त्यांची फिरकी घेतली. "काही दिवसांपूर्वी चव्हाण सांगत होते की १९ डिसेंबरला पंतप्रधान बदलतील, आता ते एपस्टीन फाईल्सचे नवे खूळ घेऊन आले आहेत. त्यांच्याकडे जनतेला सांगण्यासारखे ठोस काहीच उरलेले नाही. तुम्ही भारतीय लष्कराच्या शौर्यावर संशय व्यक्त करता, ही कसली देशभक्ती? तुम्ही मोदींवर जेवढे चिखलफेक कराल, तेवढ्याच ताकदीने देशातील जनता मोदींच्या पाठीशी उभी राहील," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राहुल गांधींवर 'देशद्रोहा'चा शिक्का
यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांच्यावरही कडाडून टीका केली. राहुल गांधी परदेशात जाऊन देशाची बदनामी करतात आणि पाकिस्तानची भाषा बोलतात, असा आरोप शिंदेंनी केला. "लष्कराचा अपमान करणे आणि युद्धात आपण हरलो होतो असे म्हणत आनंद मानणे, हे यांचे 'पाकिस्तान प्रेम' आहे. हा एक प्रकारचा देशद्रोह आणि देशाशी केलेली बेईमानी आहे. जनता याला चोख प्रत्युत्तर देईल," असे ते म्हणाले.
पुण्यात काँग्रेसला मोठे खिंडार!
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. उल्हास बागुल यांच्यासारख्या अनुभवी नेत्याने शिवसेनेत प्रवेश केल्याने पुण्याच्या राजकारणात नवीन समीकरणे उदयाला आली आहेत. "विकसित भारताच्या संकल्पात सामील होण्यासाठी अनेक दिग्गज नेते आमच्यासोबत येत आहेत," असे सांगत शिंदेंनी आगामी निवडणुकीसाठी विजयाचा निर्धार व्यक्त केला.
पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींवर काय केला आरोप?
अमेरिकेतील कुप्रसिद्ध 'जेफ्री एपस्टीन सेक्स स्कँडल' प्रकरणातील गोपनीय फाईल्स उघड होत असतानाच, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अत्यंत गंभीर आणि खळबळजनक दावा केला आहे. "एपस्टीनच्या ई-मेल्समध्ये पंतप्रधान मोदींचा उल्लेख असून, अमेरिकेतील एका बड्या अधिकाऱ्याची मोदींशी भेट घालून देण्यासाठी एपस्टीनने चक्क मध्यस्थी केली होती," असा आरोप चव्हाण यांनी केल्याने भारतीय राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
-
पुण्यात गॅसवरची दाहिनी बंद! घरगुती सिलेंडरसाठी 'एवढे' दिवस वाट पाहावी लागणार, हॉटेलंवर टंचाईचे सावट -
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
Bihar next cm : ठरलं! 'हा' नेता होणार बिहारचा नवा मुख्यमंत्री! नितीश कुमार दिल्लीला जाणार.. -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
Todays Horoscope marathi : आज या राशींचे नशीब चमकणार! पाहा सोमवार 9 मार्चचे तुमचे राशीभविष्य -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
Kuldeep yadav wedding date : कुलदीप यादव बोहल्यावर चढणार! कोण आहे होणारी पत्नी वंशिका? जाणून घ्या -
'धुरंधर-2' चा राडा! पहिल्याच दिवशी 'एवढी' कमाई; 'रणवीर'च्या चित्रपटाचे रेकॉर्डब्रेक ॲडव्हान्स बुकींग








Click it and Unblock the Notifications