सीएम एकनाथ शिंदेंच्या संवेदनशीलपणाचे दर्शन, अपघातग्रस्ताला ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन मदत
ठाणे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेकदा संवेदनशीलपणा दाखवत अनेकांची मदत केली. कुणी आजारी असेल तर त्याला मदत असो की, अपघातग्रस्तांना मदत असो. हा मुद्दा प्रत्येकवेळी चर्चेचा ठरला आहे. विशेष म्हणजे या कृतीतून ते किती सामान्य आहेत आणि सामान्यांसाठी काम करतात हेही दिसून येते. असाच एक प्रकार आज सकाळी ठाणे येथे घडला. यावेळी झालेल्या अपघातात मुख्यमंत्र्यांनी देवदुताची भूमिका पार पाडली.
आता तुम्ही म्हणाल की, नेमके काय झाले..तर हा प्रसंग तुम्हाला या रिपोर्टमधुन सविस्तर समजेल.त्याचे झाले असे की, आज विधिमंडळात जाण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या ताफ्यासह निघाले. त्यांच्यासोबत ताफ्यात नेहमीप्रमाणे रुग्णवाहीकाही होती. त्यावेळी विक्रोळीजवळ अचानक एका रिक्षाचा अपघात झाला.

अपघातावेळी नेमके काय झाले?
आज सकाळी ठाणे येथून अधिवेशनासाठी निघाले असता विक्रोळीजवळ एका रिक्षाचा अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ आपला ताफा थांबवून या अपघातात जखमी झालेल्या वृद्ध महिलेकडे गेले. त्यांनी त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.
ठाणे येथून आज सकाळी विधिमंडळ अधिवेशनासाठी निघालो असता विक्रोळीजवळ एका रिक्षाचा अपघात झाल्याचे माझ्या निदर्शनास आले. यावेळी मी माझा ताफा थांबवून या अपघातात जखमी झालेल्या वृद्ध महिलेची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. तसेच माझ्या ताफ्यातील ऍम्ब्युलन्स आणि अधिकारी सोबत देऊन त्यांना… pic.twitter.com/dK2TZImhj7
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 10, 2024
ठाणे येथून आज सकाळी विधिमंडळ अधिवेशनासाठी निघालो असता विक्रोळीजवळ एका रिक्षाचा अपघात झाल्याचे माझ्या निदर्शनास आले. यावेळी मी माझा ताफा थांबवून या अपघातात जखमी झालेल्या वृद्ध महिलेची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. तसेच माझ्या ताफ्यातील ऍम्ब्युलन्स आणि अधिकारी सोबत देऊन त्यांना… pic.twitter.com/dK2TZImhj7
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 10, 2024ताफ्यातील रुग्णवाहिका अपघातग्रस्तांसाठी
अपघातग्रस्त महिलेला धीर देत मुख्यमंत्र्यांनी सोबतच्या काही जणांना सूचना केल्या. आपल्या ताफ्यातील ऍम्ब्युलन्स आणि आपला अधिकारी सोबत देऊन त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करायला सांगितले. यावरुन मुख्यमंत्री किती संवेदनशील आहेत याची प्रचिती या महिलेला आली.
मुख्यमंत्र्यांचे महिलेने मानले आभार
मुख्यमंत्र्यांच्या या कृतीबद्दल अपघातग्रस्त महिलेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. त्यांनी दाखवलेल्या या संवेदनशीलतेमुळे या महिलेला लगेचच उपचार मिळू शकले. यासंदर्भा्त एक व्हिडिओही सोशल मीडियावर समोर आला आहे. या कृतीमुळे संवेदनशील मुख्यमंत्री ही छबी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.












Click it and Unblock the Notifications