..तर बाळासाहेबांनी अशा नेत्यांचं थोबाड फोडलं असतं; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले
Eknath Shinde on Arvind Sawant : ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिंदेंच्या शिवसेनेतील महिला उमेदवार सायना एनसी यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केले. त्यावरुन राज्यात चांगलाच वाद पेटला. भाजप शिवसेनेकडून अरविंद सावंत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला जात आहे.
त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. तर महिलांबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या नेत्यांचं बाळासाहेब ठाकरेंनी थोपाडं फोडलं असतं, असे म्हणत त्यांनी अरविंद सावंत यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

काय म्हणाले होते अरविंद सावंत?
निवडणुकीचा प्रचार करत असताना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शायना एनसी यांच्याबाबत प्रतिक्रिया देताना वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले की, 'त्या आयुष्यभर भाजपात राहिल्या आणि आता शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात आल्या. पण इथे इम्पोर्टेड चालत नाही. आमच्या इथे ओरिजनल माल चालतो'. त्यांच्या या विधानावर आता शायना एनसी यांनी आक्षेप घेतला. त्यांनी पोलिस ठाणे गाठून वक्तव्यावरु तक्रार दाखल केली. त्यानंतर अरविंद सावंत यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या शायना एनसी यांना मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेसाठी उतरवण्यात आले. हा मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला आल्याने या ठिकाणी शायना एनसी यांनी शिवसेनेते प्रवेश केला. व या ठिकाणाहून त्या मैदानात उतरल्या आहेत. तर शायना एनसी यांच्याविरोधात काँग्रेस पक्षाने अमिन अमीरअली पटेल यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवलं आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?
खासदार अरविंद सावंत यांच्या विधानावर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, शायना एनसीबाबत जे विधान केलंय त्याचा मी निषेध करतो. बाळासाहेब असते तर अशा नेत्यांचं थोबाड फोडलं असतं. लाडक्या बहिणीच्या बाबत असं विधान करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, त्यांना जनताच उत्तर देईल, असेही ते म्हणाले.
अरविंद सावंतांनी काय केले स्पष्टीकरण?
अरविंद सावंत यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता खुद्द खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, पोलिसांचं कौतुक नोटीस न देता गुन्हा दाखल केलाय. पोलीस स्थानकात गोळी झाडली गेली, ठाण्यात अत्याचार झाला, महिला पत्रकाराला बोलले काय गुन्हा दाखल झाला? सत्तेत असाल तर काही करा, गुन्हा दाखल होणार नाही.
मला बदनाम करण्याचे कटकारस्थान
खासदार अरविंद सावंत म्हणाले की, मला बदनाम करण्याचे कटकारस्थान रचलं गेलंय. ती माझी मैत्रिण होती, मी तिचा अपमान कशाला करेल. ही ढोंगी लोकं आहेत. तुमच्या पक्षात सत्तेत असाल तर काहीही करा असं आहे. तुम्हाला एथिक्स नाहीत. तुम्ही भ्रष्ट लोकं आणि ते आरोप करतात तेव्हा वाईट वाटतं. काहीच नाही करता येत अरविंद सावंत वर मग त्यालाच बदनाम करा.
नोटीस न देता एफआयआर दाखल कसं करु शकतात? संजय राठोडांविरोधात गप्प का राहिलात? ऐन निवडणुकीत यांचा काही वापर करता येईल का? म्हणून सर्व आहे हे.. ही सर्व मोदींची चेले मंडळी आहेत. कायदेशीर कारवाईला सामोरे जावू.
-
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
Todays Horoscope marathi : आज या राशींचे नशीब चमकणार! पाहा सोमवार 9 मार्चचे तुमचे राशीभविष्य -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
Kuldeep yadav wedding date : कुलदीप यादव बोहल्यावर चढणार! कोण आहे होणारी पत्नी वंशिका? जाणून घ्या -
पुरुषांनो, 'या' 5 सामान्य लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; असू शकतो वाढलेल्या प्रोस्टेटचा धोका!









Click it and Unblock the Notifications