Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी! एकनाथ खडसे यांची राजकीय निवृत्तीची घोषणा; भावनिक होत म्हणाले, पुढची निवडणूक मी...

Eknath Khadse's announcement of political retirement- गेल्या चार दशकांपासून महाराष्ट्रातील राजकारणात आपल्या प्रभावी भाषणशैलीने प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ नेते, आमदार एकनाथ खडसे यांनी सोमवारी राजकीय सन्यासाची घोषणा केली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांनी ही घोषणा करुन कार्यकर्त्यांना भावनिक केले. यापुढे आपण कोणतीही निवडणूक लढणार नसल्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. पुढील निवडणूक मी पाहणार की नाही पाहणार हे तो ईश्वरच ठरवेल, असे म्हणत त्यांनी मुलगी रोहिणी खडसे हिला विजयी करण्याचे आवाहन केलं.

Eknath Khadse

रोहिणी खडसेंनी शेअर केला व्हिडीओ

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे की, मी नाथाभाऊ बोलत आहे. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक आहे. या निवडणुकीत रोहिणी खडसे राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत. यापुढे मी निवडणूक लढवणार नाही. मी गेली अनेक वर्षे आपल्या सोबत आहे. गेली अनेक वर्षे आपण सर्वांनी मला सहकार्य केलं. कधी जात-धर्म न पाहता मी सर्वांना मदत केली. प्रकृतीच्या कारणामुळे मी पुढची निवडणूक पाहणार की नाही, हे ईश्वरच ठरवेल. परंतु आपण मला जसे सहकार्य केले, तसे सहकार्य रोहिणी खडसे यांना करावे आणि निवडून आणावे, असे भावनिक आवाहन एकनाथ खडसे यांनी केलं.

चार दशकांचा झंझावाताला विश्रांतीला

खडसे यांनी जवळपास चार दशके जळगाव जिल्ह्यातील नाही तर महाराष्ट्रातील राजकारण गाजवले. सभागृहातील त्यांची भाषणे प्रचंड गाजली होती. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत एकनाथ खडसे राज्यातील भाजपचा चेहरा होते. पक्षाला वाढवण्यात गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर खडसे यांचे मोलाचे योगदान होते. एकनाथ खडसे यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दची सुरुवात 1987 साली कोथडी गावाचा सरपंच म्हणून केली. त्यानंतर आमदार, विरोधी पक्ष नेता, 12 खात्याचे मंत्री अशी विविध पदे त्यांनी भूषवली. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत त्यांचे नाव आले होते. परंतु त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर भाजपमध्ये एकनाथ खडसे यांचे स्थान कमी होऊ लागले. त्यामुळे त्यांनी 2020 मध्ये भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+