गिरीश महाजन अन् फडणवीस हे जे.पी. नड्डांपेक्षा मोठे नेते; एकनाथ खडसेंचा खोचक टोला
Eknath Khadse On BJP Entry : भाजपमध्ये जे. पी. नड्डा यांच्या हस्ते माझा प्रवेश झाला होता, तो त्यांनी जाहीर करायला पाहिजे होता. मात्र मंत्री गिरीश महाजन आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी विरोध केल्याने तो जाहीर झाला नाही, असा आरोप विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी केला. जे.पी. नड्डा जर माझा पक्षप्रवेश जाहीर करू शकत नसतील, तर त्यांच्या पेक्षा गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते मोठे आहेत, असे म्हणत खडसे यांनी दोन्ही नेत्यांना खोचक टोला लगावला. ते जळगावात माध्यमांशी बोलत होते. भाजप पक्ष प्रवेशावरुन त्यांनी पुन्हा महाराष्ट्रातील दोन्ही नेत्यांवर निशाणा साधला.
तर मी पुन्हा राष्ट्रवादीत जाईल
एकनाथ खडसे म्हणाले, मी संभ्रम अवस्थेत आहे, कन्फ्युज आहे हे मान्य आहे. गेली पाच ते सहा महिने भाजपने मला प्रवेश देऊनही तो जाहीर केला नाही. याचा अर्थ माझी त्यांना आवश्यकता नाही असेच म्हणावे लागेल. काही अडचणीमुळे मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. त्या अडचणी आजही कायम आहेत, भाजपाला गरज नसेल तर माझा मूळ पक्ष काय वाईट आहे? मी या ठिकाणी आमदार आहे, अजून चार वर्ष आमदार राहणार आहे. भाजपने मला घेतले नाही तर मी राष्ट्रवादीत जाईल. अर्थात मी अजूनही राष्ट्रवादीचा सदस्य आहे. मी राष्ट्रवादी पक्ष सोडलेला नाही.

अधिकाऱ्याने दबावाला बळी पडू नये
पुढे बोलताना खडसे म्हणाले,अनिल देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उभ राहणार अशी चर्चा आहे.आपल्या विरोधी लोकांना राजकीय हेतूने संपविण्याचा हा प्रयत्न दिसतो आहे. अनिल देशमुख दबावाने काम करत असतील तर ते राजकीय व्यक्ती आहेत, मात्र अधिकाऱ्याने कोणत्याही दबावाला बळी न पडता काम करायला हवे होते. कोणीही दबाव आणला तरी नियमाने काम करणे हे अधिकाऱ्याचे काम होते.
म्हणून महाजन कुठेही नाव घेतात
अनिल देशमुख यांनी मला सांगितल की, गिरीश महाजन मला छळत आहेत. नाथाभाऊ यांचे नाव घे, असं मी म्हटल तर योग्य होईल का? असा सवालही खडसे यांनी उपस्थित केला आहे. अनिल देशमुख यांनी माध्यमांसमोर येऊन सांगावं की मी त्यांना सांगितल आहे. म्हणजे मला मान्य करता येईल, गिरीश महाजन यांचे आणि आपले मधुर संबंध असल्याने ते आपलं नाव नेहमी कुठे ना कुठे घेत असतात.












Click it and Unblock the Notifications